PHOTOS

भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS Imphal; पाहा कसा करणार शत्रूचा नायनाट

असून, ही युद्धनौका हिंदी महासागरामध्ये तैनात करम्यात येणार आहे. पाह...

Advertisement
1/7
पूर्वोत्तर शहराचं नाव
पूर्वोत्तर शहराचं नाव

भारताच्या पूर्वोत्तरेला असणाऱ्या शहरावरून नाव असणारी ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे. 26 डिसेंबर 2023 रोजी नौदलाच्या ताफ्यात या युद्धनौकेचा समावेश करण्यात आला. 

2/7
शस्त्रास्त्र सुसज्ज
शस्त्रास्त्र सुसज्ज

अण्वस्त्र, बायो वेपन, केमिकल वेपन अशा कोणत्याही माऱ्यामध्ये ही युद्धनौका तग धरू शकते. 

 

3/7
क्षेपणास्त्र
क्षेपणास्त्र

INS Imphal च्या क्षमतेत वाढ करण्यासाठी तिच्यावर ब्रह्मोसही तैनात ठेवण्यात आलं आहे. शिवाय या युद्धनौकेवर मध्यम ते अधिक अंतरावरील लक्ष्यभेद करणारी इतरही क्षेपणास्त्र आहेत. 

4/7
सुपर रॅपिड गन
सुपर रॅपिड गन

या युद्धनौकेवर रोधी पाणबुडी, स्वदेशी रॉकेट लाँचर आणि सुपर रॅपिड गनही तैनात करण्यात आल्या आहेत. 

 

5/7
ताशी वेग
ताशी वेग

ताशी 56 किमी म्हणजेच ताशी 30 समुद्री मैल वेगानं जाणाऱ्या या युद्धनौकेवरील रडारच्या माध्यमातून क्षणात शत्रूचा शोध घेऊन नायनाट करता येऊ शकतो. 

6/7
स्वदेशी युद्धनौका
स्वदेशी युद्धनौका

INS Imphal ची लांबी 535 फूट असून, या युद्धनौकेचं वजन 7400 टन इतकं असून, युद्धनोकेची निर्मिती करण्यासाठी 75 टक्के स्वदेशी सामानाचा वापर करण्यात आला आहे. 

 

7/7
नौदलाची ताकद
नौदलाची ताकद

या युद्धनौकेच्या माध्यमातून चीनसारख्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी नौदलाची ताकद वाढणार आहे. 

 





Read More