PHOTOS

Train दिवसापेक्षा रात्रीच्या वेळेत वेगात का धावतात? 'हे' आहे यामागील रंजक कारण

रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी आहे. रेल्वेने दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेकडून मेल, एक्स्प्रेस, शताब्दी, दुरांतो आणि वंदे भ...

Advertisement
1/7

तुम्ही कधी विचार केलायं का? रात्र आणि दिवस असण्याचा रेल्वेच्या वेगावर परिणाम का होतो? दिवसा रेल्वेचा वेग कमी असतो. तोच रात्रीच्या वेळेत रेल्वेचा वेग जास्त असतो. 

2/7

याचे मुख्य कारण म्हणजे रात्रीच्या वेळी रेल्वे रुळावर हालचालींना फारसा वाव नसतो. 

3/7

रात्रीच्या वेळी लोक किंवा प्राणी रेल्वे रुळांवर आडवे येत नाहीत. कुठलाही आवाज किंवा कोणताही गोंगाट नसतो. याशिवाय रात्रीच्या वेळी रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जात नाही. त्यामुळे रात्रीच्या ट्रेनचा वेग जास्त असतो. 

4/7

दुसरे कारण म्हणजे रात्री अंधाराचा जास्त फायदा असतो. अंधारात ट्रेन चालवण्याचा एक मोठा फायदा म्हणजे लोको पायलटला लांबूनच सिग्नल दिसतो. अशा परिस्थितीत ट्रेन थांबवायची आहे की नाही हे लोको पायलटला दुरुनच कळते. 

5/7

यामुळे ट्रेनचा वेग कमी करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या सुसाट वेगाने धावत असल्याचे दिसून येते. 

6/7

वास्तविक, दिवसा रेल्वेत प्रवाशांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर असते. तसेच, ठिकठिकाणी गोंगाट असतो. त्यामुळे लांबून सिग्नल व्यवस्थित  दिसत नाही. एवढेच नाही तर दिवसाही लोक रेल्वे रुळांवर इकडे तिकडे फिरत असतात. 

7/7

 अशा परिस्थितीत चालकाला अत्यंत सावधपणे ट्रेन चालवावी लागते आणि त्यामुळे दिवसा रेल्वेचा वेग जास्त नसतो.





Read More