PHOTOS

तिकीट रद्द केल्यावर किती मिळतो परतावा? काय सांगतो रेल्वेचा नियम?

े तुम्हाला किती रिफंड देते? याबद्दल फार कमी जणांनाच माहिती असते. तुम्हीदेखील रेल्वे प्रवासासाठी तिकिट बुकींग करत असाल तर कॅन्...

Advertisement
1/9
तिकीट रद्द केल्यावर किती मिळतो परतावा? काय सांगतो रेल्वेचा नियम
तिकीट रद्द केल्यावर किती मिळतो परतावा? काय सांगतो रेल्वेचा नियम

Indian Railways: देशात दररोज करोडो भारतीय ट्रेनमधून प्रवास करतात. देशाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये भारतीय रेल्वेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यामुळेच भारतीय रेल्वेला देशाची जीवनरेखा देखील म्हटले जाते. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना नेहमी खूप गर्दी असते. त्यामुळे प्रवास करण्याआधी लोक जागा आरक्षित करण्यावर जास्त भर देतात.

2/9
कॅन्सलेशन चार्ज
 कॅन्सलेशन चार्ज

असे असले तरी काही वेळा प्लॅनमध्ये बदल होतो. किंवा अन्य काही कारणांमुळे प्रवाशांना तिकीट रद्द करावे लागते. भारतीय रेल्वेकडून तिकीट रद्द केल्यावर कॅन्सलेशन चार्ज आकारले जाते..

3/9
किती रिफंड?
किती रिफंड?

तिकीट रद्द केल्यावर भारतीय रेल्वे तुम्हाला किती रिफंड देते? याबद्दल फार कमी जणांनाच माहिती असते. तुम्हीदेखील रेल्वे प्रवासासाठी तिकिट बुकींग करत असाल तर कॅन्सलेशन चार्जेसबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

4/9
प्रति प्रवासी 240 रुपये
 प्रति प्रवासी 240 रुपये

ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी तुम्ही तुमचे कन्फर्म केलेले तिकीट रद्द केल्यास किती चार्ज घेतला जातो. याबद्दल जाणून घ्या. एसी फर्स्ट क्लास आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या कन्फर्म तिकिटांवर प्रति प्रवासी 240 रुपये कॅन्सलेशन चार्ज कापला जातो.

5/9
सेकंड एसी
सेकंड एसी

सेकंड एसी मधील तिकीट रद्द केल्यास प्रति व्यक्ती 200 रुपये कॅन्सलेशन चार्ज कापला जातो. 

6/9
थर्ड एसी इकॉनॉमी
थर्ड एसी इकॉनॉमी

तुम्ही थर्ड एसी चेअर किंवा थर्ड एसी इकॉनॉमीमध्ये तुमचे तिकीट बुक केले असेल आणि तुम्ही ते रद्द करत असाल तर तुमचे 180 रुपये रद्दीकरण शुल्क कापले जाईल.

7/9
स्लीपर क्लास
स्लीपर क्लास

तुमचे तिकीट स्लीपर क्लासचे असल्यास भारतीय रेल्वे तुमच्याकडून 120 रुपये रद्द करण्याचा शुल्क आकारेल.

8/9
सेकंड क्लास
सेकंड क्लास

तर द्वितीय श्रेणीमध्ये, रद्दीकरण शुल्क 60 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

9/9
25 टक्के रक्कम
25 टक्के रक्कम

तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 48 तास आणि 12 तास आधी ट्रेनचे तिकीट रद्द केले तर रकमेच्या 25 टक्के रक्कम कॅन्सलेशन चार्ज म्हणून आकारली जाते.





Read More