PHOTOS

स्वतंत्र भारतातील हा रेल्वेमार्ग आजही ब्रिटीशांचा 'गुलाम'? भरावा लागत होता कोट्यवधींचा लगान

भारतीय रेल्वेतील 'हा' मार्ग आजही ब्रिटीशांचा गुलाम? काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या... 

...
Advertisement
1/7
भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे

Indian Railway News : दर दिवशी जवळपास 2 कोटींहून अधिक प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणाऱ्या भारतीय रेल्वेकडून मागील काही वर्षांमध्ये अनेक नव्या सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. आजच्या घडीला भारतीय रेल्वेच्या अख्तयारित जवळ पास 7 हजारांहून अधिक रेल्वेगाड्या रुळांवर असून, त्यामुळं खऱ्या अर्थानं देश जोडला गेला आहे. 

 

2/7
ब्रिटीश कंपनी
ब्रिटीश कंपनी

स्वतंत्रपूर्व काळापासून सुरु झालेलं रेल्वेचं हे जाळं आजच्या घडीला संपूर्ण देशभरात पसरलेलं असतानाच एक कमाल गोष्टही जाणूनच घ्या. कारण, आजही देशात एक असा रेल्वेमार्ग आहे जो इंग्रजांच्या मालकीचा असून, या रेल्वे मार्गासाठी भारतीय रेल्वेला रॉयल्टीसुद्धा भरावी लागत होती. हा नॅरो गेज रेल्वे मार्ग क्लिक निक्सन एंड कंपनी या ब्रिटीश कंपनीच्या मालकीचा आहे. 

 

3/7
1 कोटी 20 लाख रुपये इतकी रॉयल्टी
 1 कोटी 20 लाख रुपये इतकी रॉयल्टी

एका खासगी ब्रिटीश कंपनीची मालकी असणारा हा रेल्वे मार्ग खरेदी करण्याचा प्रयत्न आजवर भारतीय रेल्वेनं अनेकदा केला. पण, त्यावर काहीही तोडगा निघू शकलेला नाही. उपलब्ध माहितीनुसार भारतीय रेल्वे दर दिवशी या रेल्वे रुळ/ मार्गाच्या वापरासाठी ब्रिटीश कंपनीला 1 कोटी 20 लाख रुपये इतकी रॉयल्टी द्यावी लागत होती. 

 

4/7
सिग्नल आजही ब्रिटीशकालीन
सिग्नल आजही ब्रिटीशकालीन

भारतातील या नॅरो गेज रेल्वे मार्गावर शकुंतला एक्स्प्रेस नावाची एकच पॅसेंजर ट्रेन धावत होती. ज्यामुळं या रेल्वे मार्गाला शकुंतला रेल ट्रॅक असंही म्हणतात. अचलपूर, यवतमाळदरम्यान साधारण 17 लहानमोठ्या गावांच्या स्थानकावर ही रेल्वे थांबायची. हा प्रवास साधारण 20 तासांचा असतो. ही रेल्वे अधिक स्थानकांवर थांबत असल्यामुळं हा प्रवास अधिक मोठा ठरत होता. सुरुवातीला ही रेल्वे वाफेच्या इंजिनावर धावत होती. 1921 त्याची निर्मिती ब्रिटनच्या मँचेस्टर इथं करण्यात आली होती. 1994 मध्ये या रेल्वेला डिझेल इंजिन जोडण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे या रेल्वेला असणारे सिग्नल आजही ब्रिटीशकालीन आहेत. 

 

5/7
प्रवासी
प्रवासी

शकुंतला रेल ट्रॅकवर धावणारी ही रेल्वे आता बंद करण्यात आली आहे. सध्या या भागात, रेल्वे मार्गांदरम्यान येणाऱ्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी ही रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. 5 डब्यांसह धावणारी ही रेल्वे दर दिवशी साधारण 800 ते 1000 प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवत होती. 

 

6/7
भारताच्या ताब्यात
भारताच्या ताब्यात

1951 मध्ये भारतात रेल्वेला केंद्राच्या अख्तयारित घेण्यात आलं पण हा रेल्वे मार्ग मात्र भारताच्या ताब्यात आला नाही. हा मार्ग रेल्वेच्याच जमिनीवर असल्यामुळं कालांतरानं त्यासाठी भरली जाणारी रॉयल्टीची रक्कमही देणं बंद झालं. 

 

7/7
ब्रिटीशांची दूरदृष्टी
ब्रिटीशांची दूरदृष्टी

महाराष्ट्राच्या अमरावती क्षेत्रामध्ये होणारं कपाशीचं उत्पादन पाहता हा कच्चा माल मुंबई बंदरापर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्रजांनी या रेल्वे मार्गाची निर्मिती केली होती. 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा क्लिक निक्सन एंड कंपनीसोबत एक करार करण्यात आला. ज्याअंतर्गत भारतीय रेल्वेनं दरवर्षी या कंपनीला रेल्वेमार्गाच्या वापरासाठीची रॉयल्टी देणं अपेक्षित होतं. 

 





Read More