PHOTOS

घातक! खडतर प्रशिक्षणापासून काचेचा तुकडा चावून गिळेपर्यंत; असे घडतात Special Forces चे Commando

गोपनीय मोहिम असो किंवा शत्रूला त्याच्या तळावर जाऊन ठार करणं असो. भारतीय लष्कराचाच भाग असणाऱ्या विविध Commando Forces पैकी सर्वात घातक ...

Advertisement
1/8
Indian Commando
Indian Commando

घातक! खडतर प्रशिक्षणापासून काचेचा तुकडा चावून गिळेपर्यंत; असे घडतात Special Forces चे Commando. प्रशिक्षण इतकं खडतर, की वाचूनच तुम्हाला थरथराट भरेल. इथं येण्यासाठी वाघाचं काळीज लागतं... 

2/8
Marcos Commando Force
Marcos Commando Force

मार्कोस कमांडो फोर्सही देशातील नेवी सील्स म्हणून ओळखली जाते. 1987 मध्ये या फोर्सची स्थापना झाली. अमेरिकन सैन्याला दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाप्रमाणं या तुकडीला प्रशिक्षण दिलं जातं. या तुकडीत असणारे सर्वोत्तम स्नायपर्स दूरूनच नेम साधून शत्रूच्या मस्तकातून गोळी आरपार पोहोचवतात. 

3/8
CoBRA Commando Force
CoBRA Commando Force

2008 मध्ये या तुकडीची स्थापना झाली. कमांडो बटालियन फॉर रिजॉल्यूट अॅक्शन असं या तुकडीचं संपूर्ण नाव. गोरिल्ला अर्थात गनिमी कावा आणि तत्सम युद्धनितीमुळं या तुकडीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. सध्याच्या घडीला या तुकडीत 10 हजार कमांडो आहेत. 

4/8
Para SF
Para SF

पाकव्याप्त काश्मीरमध्ये डोगरा रेजिमेंटच्या साथीनं सर्जिकल स्ट्राईक करणारी तुकडी म्हणजे Para SF. या कमांडोंना पॅराशूट कमांडो असंही म्हणतात. 1965 मध्ये भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान ही तुकडी जन्मास आली. 

5/8
Para SF
Para SF

या तुकडीतील जवानांना 9 महिन्यांमध्ये 30 ते 35 हजार फूट इतक्या उंचीवरून उडी मारणं, प्रचंड वजन घेऊन पळणं इथपासून प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात हातातील ग्लास दातानं तोडून तो चावून गिळणं असं रक्त गोठवणारं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. भीती आम्हाला ठाऊकच नाही हेच यातून कळतं. 

6/8
NSG Commando Force
NSG Commando Force

देशावर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर NSG Commando Force बाबत बरीच चर्चा होऊ लागली. नॅशनल सिक्योरिटी गार्ड असं या तुकडीचं नाव. 

7/8
NSG Commando Force
NSG Commando Force

1984 पासून सेवेत असणाऱ्या या तुकडीत सध्या 10 जवान तैनात आहेत. या तुकडीत सहभागी असणाऱ्या जवानांना 14 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. 

8/8
Garud Commando Force
Garud Commando Force

ही भारतीय वायुदलाची एक घातक तुकडी आहे. 2004 मध्ये सुरु झालेल्या या तुकडीसाठी 72 आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. रात्रीच्या अंधारात, उसळत्या पाण्यात अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये या तुकडीतील जवान शत्रूवर हल्ला करण्यास सज्ज असतात. 

 





Read More