PHOTOS

ICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

edule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्...

Advertisement
1/10

भारताच्या मिशन वर्ल्ड कपचं बिगुल 5 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर वाजणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार आहे. (World Cup Qualifiers) 

2/10

क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. 

3/10

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. भारतीय टीम 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीची वाट पाहत आहे. 

4/10

ज्या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात ती क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या हाय व्होल्टेज मॅचची प्रत्येक भारतीय आणि पाकिस्तानी वाट पाहत असता.

5/10

एक लाख चाहते ही मॅच प्रत्यक्ष पाहू शकणार आहे. वर्ल्ड कपची सेमी फायनल 15 आणि 16 तर फायनल 19 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

6/10

वेळापत्रकानुसार उपांत्य फेरीचं ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही. टीम इंडिया  9 सामने 9 ठिकाणी खेळणार आहेत. भारताचा पहिला सामना चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियासोबत दुसरा सामना 11 ऑक्टोबरला दिल्लीत अफगाणिस्तानशी, 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकसोबत तर 19 ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशसोबत होणार आहे. 

7/10

टीम इंडियाच्या इतर सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर 22 ऑक्टोबरला धर्मशालामध्ये न्यूझीलंडविरुद्ध, 29 ऑक्टोबरला लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध, 2 नोव्हेंबरला मुंबईत क्वालिफायर संघाविरुद्ध, 5 नोव्हेंबरला कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 11 नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये क्वालिफायर होणार आहे. 

8/10

पाकिस्तानदेखील 5 ठिकाणी मॅच खेळणार आहे. पाकिस्तान अहमदाबादनंतर हैदराबादमध्ये 6 आणि 12 ऑक्टोबरला 2 क्वालिफायर सामने खेळणार आहे. तर 20 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया, 23 ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये अफगाणिस्तानसोबत तर 27 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिका आणि 31 ऑक्टोबरला बांग्लादेश तर 12 नोव्हेंबरला कोलकातामध्ये बांगलादेशशी दोन हात करणार आहे. पाकिस्तान 5 नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडशीही एक सामना खेळणार आहे. 

9/10

बीसीसीआयने आयसीसीला हे वेळापत्रक पाठवलंय. आयसीसीने मान्यता दिल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. 2011 पासून भारतीय संघाने वर्ल्ड कपवर आपल्या नावावर केलेला नाही. 

10/10

वर्ल्डकपचा थरार 10 संघामध्ये रंगणार आहे. प्रत्येक संघ 9-9 सामने खेळणार असून टॉप 4 संघ उपांत्य फेरीत धडक मारणार आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचा पराभव करुन इंग्लंडने वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते.





Read More