PHOTOS

Neil Armstrong नंतर चंद्रावर 'मूनवॉक' करुन आलेले 'ते' 11 जण कोण?

The Moon: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेअंतर्ग विक्रम लँडरने 23 ऑगस्टर 2023 रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी यशस्वीरित...

Advertisement
1/12

20 जुलै 1969 रोजी अपोलो 11 मधून चंद्रावर पोहचलेली पहिली व्यक्ती म्हणजे या यानाचे कमांडर नील आर्मस्ट्राँग. निल आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यानंतर "One small step for man, one giant leap for mankind," असं म्हटलं होतं.

2/12

लुनार मॉड्यूअलचे पायलट एडविन बझ ऑल्ड्रिन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे दुसरे व्यक्ती होते. तेच लुनार मॉड्यूअलमधून नील आर्मस्ट्राँग यांच्याबरोबर चंद्रावर अपोलो 11 मोहिमेअंतर्गत चंद्रावर गेले होते.

3/12

पहिल्या यशस्वी मानवी चंद्र मोहिमेनंतर अवघ्या चार महिन्यात नासाने अपोलो 12 मोहीम लाँच केली. 14 नोव्हेंबर 1969 रोजी जेव्हा हे यान झेपावलं आणि 20 नोव्हेंबर रोजी हे यान चंद्रावर पोहोचलं. चार्ल्स कॉनरॅड हे या यानामधून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. ते चंद्रावर उतरणारे तिसरे अंतराळवीर ठरले.

4/12

चार्ल्स यांच्याबरोबर असलेले ॲलन बीन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे चौथे अंतराळवीर ठरले. हे दोघेही चंद्रावर पावणेआठ तास होते.

5/12

अपोलो 14 यान 31 जानेवारी 1971 रोजी लॉन्च झालं. या हे यान कमांडर ॲलन शेफर्ड यांच्या नेतृत्वाखाली झेपावली. शेफर्ड हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पाचवे आणि त्या तारखेपर्यंतचे सर्वात वयस्कर अंतराळवीर ठरले. त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवलं तेव्हा ते 47 वर्षांचे होते. 

6/12

शेफर्ड यांच्याबरोबर या मोहिमेमध्ये चंद्रावर गेलेल्या अंतराळवीराचं नाव होतं एड्जार मिचेल. एड्जार हे चंद्रावर चालणारे सहावे अंतराळवीर होते. दोघांनीही चंद्रावरुन फार मोठ्या प्रमाणात माती आणि खडक चाचण्यांसाठी आणले होते.

7/12

अपोलो 15 मोहिमेमध्ये 31 जुलै ते ऑगस्ट 1971 दरम्यान डेव्हिड स्कॉट आणि जेम्स अर्विन हे चंद्रावर जाऊन आले. डेव्हिड स्कॉट हे चंद्रावर पाऊल ठेवणारे सातवे अंतराळवीर होते.

8/12

तर जेम्स अर्विन हे सुद्धा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले होते. ते चंद्रावर उतरणारे आठवे अंतराळवीर ठरलेले. या चंद्र मोहिमेनंतर आर्विन यांचं 20 वर्षांनी निधन झालं. त्यावेळी ते चंद्रावर जाऊन आलेल्यांपैकी सर्वात कमी वयात निधन झालेले अंतराळवीर ठरलेलं.

9/12

अपोलो 16 मोहिम नासाने 26 जुलै 1971 रोजी लॉन्च केली. या यानामधून जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक चंद्रावर गेले. जॉन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे नववे अंतराळवीर होते.

10/12

चार्ल्ड ड्यूक हे चंद्रावर पाऊल ठेवणारे 10 वे अंतराळवीर ठरले. चार्ल्ड हे अमेरिकन एअरफोर्समध्ये कार्यरत होते.

11/12

अपोलो 17 मिशन चंद्रावरील शेवटचं मॅन्ड मिशन म्हणजेच मानवरहीत मिशन ठरलं. 1972 साली 11 ते 14 डिसेंबरदरम्यान ही मोहीम पार पडली. कमांडर युजीन सर्नन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे 11 वे अंतराळवीर ठरले.

12/12

कुठलीही लष्करी पार्श्वभूमी नसणारे एकमेव आणि आजच्या तारखेपर्यंत चंद्रावर पाऊल ठेवणारी शेवटी व्यक्ती म्हणजे हॅरिसन श्मिट. हॅरिसन हे भूगर्भशास्त्र होते. 





Read More