PHOTOS

भारतानं हेरली चीनची चाल; रक्त गोठवणाऱ्या बर्फाळ शक्सगाम खोऱ्यात नेमकं काय सुरु होतं?

portance: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या या तणावाच्या परिस्थितीमध्ये आता एकाएकी शक्सगाम खोऱ्याची चर्चा ...

Advertisement
1/8
पाकव्याप्त काश्मीर
पाकव्याप्त काश्मीर

India China Shaksgam Valley Importance: पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या शक्सगाम खोरं या भागात सध्या चीनकडून पक्क्या रस्त्याचं बांधकाम सुरु करण्यात आलं आहे. 

2/8
सॅटेलाईट फोटो
सॅटेलाईट फोटो

सॅटेलाईटनं टीपलेल्या फोटोंमुळं ही बाब समोर आली असून, त्यात चीन इथं सिमेंटचा पक्का रस्ता बांधत असल्याचं लक्षात येत आहे. 

3/8
सियाचीनपासून नजीकचा प्रदेश
 सियाचीनपासून नजीकचा प्रदेश

जगातील सर्वाधिक उंचीवर असणारी युद्धभूमी अशी ओळख असणाऱ्या सियाचीनपासून हा प्रदेश बराच जवळ असल्याचं सांगितलं जातं. 

4/8
शक्सगाम खोरं
शक्सगाम खोरं

दरम्यान शक्सगाम खोऱ्यामध्ये चीनकडून करण्यात येणाऱ्या या बांधकामाचा भारताकडून निषेध करण्यात येत आहे. हा आमच्याच देशाचा भाग असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून चीनला खडसावण्यात आलं आहे. 

 

5/8
पाकिस्तान- चीन
पाकिस्तान- चीन

1963 मध्ये झालेल्या पाकिस्तान- चीनमधील कथित कराराला आपण कधीच स्वीकारलं नसून, शक्सगाम खोऱ्याला आम्ही कायमच आमच्या देशाचाच एक भाग म्हणत आलो आहोत असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. 

6/8
परराष्ट्र मंत्रालय
परराष्ट्र मंत्रालय

परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार त्या कथित कराराच्या माध्यमातून पाकिस्ताननं बेकायदेशीर प्रकारे शक्सगाम खोऱ्याचा भाग चीनला सोपवण्याचा प्रयत्न केला होता. 

7/8
शक्सगामचं संरक्षण
शक्सगामचं संरक्षण

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार शक्सगाम खोऱ्याच्या परिसराचं संरक्षण करण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचा हक्क आपल्याला असून, पूर्व लडाख- चीनमधील तणावामध्ये आता शक्सगामवरही शेजारी राष्ट्राची वक्रदृष्टी असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

8/8
चीनच्या आक्षेपार्ह पावलं
चीनच्या आक्षेपार्ह पावलं

सध्याच्या घडीला चीनच्या आक्षेपार्ह पावलामुळं जागतिक स्तरावर शक्सगामचं खोरं चर्चेचा विषय ठरत असून, या भागाचे फोटोही सोळल मीडियावर व्हायरल होत आहेत. 





Read More