PHOTOS

118 कोटी रुपयांना घरासमोरची अख्खी बिल्डिंगच विकत घेतली! मुंबईकर महिला चर्चेत; कारण फारच रंजक

e Building For 118 Crore: मुंबईमध्ये घर घेणं म्हणजे सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मुंबई जगात...

Advertisement
1/15

मुंबईत राहणाऱ्या शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि भारतामधील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रेखा झुनझुनवाला यांनी नुकतीच एक संपूर्ण इमारत विकत घेतली आहे.

 

2/15

आता देशातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिलेला इमारत विकत घेतली तर यात काय मोठी गोष्ट आहे? असं तुम्हाला वाटू शकतं. पण ही इमारत रेखा झुनझुनवाला यांनी विकत घेण्यामागील कारण फारच रंजक आहे.

 

3/15

रेखा झुनझुनवाला यांच्या मुंबईतील बंगल्यामधून समुद्राचा व्ह्यू दिसतो. मात्र या ठिकाणी असलेल्या एका इमारतीचं पुन:विकास होऊन तिथे उंच इमारत उभी राहणार होती. असं झालं असतं तर रेखा झुनझुनवाला यांच्या घरतून दिसणाऱ्या सी व्ह्यूमध्ये अडथळा आला असता. म्हणून त्यांनी संपूर्ण इमारतच विकत घेतली. 

4/15

रेखा झुनझुनवाला यांनी त्यांच्या बंगल्यासमोर असलेली संपूर्ण इमारतच विकत घेतली आहे. मागील 4 महिन्यांमध्ये त्यांनी एक एक करत या इमारतीमधील 9 फ्लॅट विकत घेतले. 

 

5/15

'फोर्ब्स'ने दिलेल्या माहितीनुसार, रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 66 हजार कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या मालकीच्या संपत्तीमधील बराचसा वाटा त्यांचे पती आणि शेअरबाजार एक्सपर्ट दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्याकडून वारसा हक्काने मिळालेली आहे. 

6/15

रेखा झुनझुनवाला यांच्या नावावर सध्या राकेश झुनझुनवालांकडील सर्व स्टॉक्सची मालकी वारसा हक्काने मिळालेली आहे. यामध्ये एकूण 29 मोठ्या कंपन्यांमधील कोट्यवधींच्या गुंतवणूकीचा समावेश आहे. यात टाटा मोटर्स आणि टायटनसारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.

 

7/15

रेखा झुनझुनवाला यांनी त्यांचा मुंबई परिसरातील मलबार हिल या परिसरातील 14 मजल्यांचं आलिशान घर आणि समुद्र किनाऱ्याच्या मधील भागात असलेली संपूर्ण इमारत 118 कोटी रुपये खर्च करुन घेतली.

8/15

'मनी कंट्रोल'ने दिलेल्या वृत्तानुसार, बंगल्यातून दिसणारा सी व्ह्यू जाऊ नये म्हणून रेखा झुनझुनवाला यांनी एवढी महागडी प्रॉपर्टी विकत घेतली. 

9/15

रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केलेल्या इमारतीचं नाव 'रॉकसाईड गृहनिर्माण सोसायटी' असं आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या 'रारी व्हील' या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या इमारतीचा पुन:विकास क्लस्टर योजनेअंतर्गत विकासक शापुरजी पलोनजी यांच्या माध्यमातून करण्याचं नियोजन होतं.

 

10/15

रेखा झुनझुनवाला यांनी या इमारतीमधील सर्व फ्लॅट मालकांना विकासक शापुरजी पलोनजी यांनी देऊ केलेल्या कार्पेट एरियावर आधारिक रक्कमेहून 50 टक्के अधिक रक्कम त्यांच्या घरांसाठी देऊ केली. 

 

11/15

रेखा झुनझुनवाला यांनी विकत घेतलेल्या रॉकसाईड गृहनिर्माण सोसायटी या इमारतीमधील 9 फ्लॅट्सपैकी प्रत्येक फ्लॅटचा सरासरी एरिया 2100 स्वेअर फूट इतका आहे. 'इंडेक्स टॅपकॉम'ने उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत घेण्यासाठी झुनझुनवाला कुटुंबाने स्टॅम्प ड्युटी म्हणून 9 कोटी 2 लाख रुपये भरले आहेत.

 

12/15

शापुरजी पलोनजी यांनी रॉकसाईड गृहनिर्माण सोसायटीच्या जागेवर उंच इमारत बांधली तर आपल्या घरातून समुद्र दिसणार नाही असं वाटल्याने रेखा झुनझुनवाला यांनी सर्व प्लॅट्स विकत घेतले. 'झॅपकी'ने दिलेल्या वृत्तानुसार वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून रेखा झुनझुनवाला यांनी इमारतीमधील 9 फ्लॅट विकत गेतले.

 

13/15

नोव्हेंबर 2023 पासून रेखा झुनझुनवाला यांनी यांनी टप्प्याटप्प्यात ही 118 कोटींची खरेदी केली. 50 वर्षांपूर्वीच्या या इमारतीमधील शेवटचा फ्लॅट रेखा झुनझुनवाला यांनी मागील आठवड्यामध्ये विकत घेतला. या फ्लॅटचा एरिया 1666 स्वेअर फूट इतका असून त्यासाठी रेखा झुनझुनवाला यांनी 11.76 कोटी रुपये खर्च केले. त्यासाठी त्यांनी 59 लाख रुपये खर्च केले.

14/15

रेखा झुनझुनवाला यांनी 1987 साली राकेश झुनझुनवाला यांच्याशी लग्न केलं. या दोघांना निशिता आणि दोन जुळी मुलं आहेत. आर्यनमॅन आणि आर्यवीर अशी जुळ्यांची नावं आहेत. 

 

15/15

राकेश झुनझुनवाला यांचा 14 ऑगस्ट 2022 रोजी वयाच्या 62 व्या वर्षी मृत्यू झाला. मृत्यूच्या वेळी राकेश झुनझुनवाला यांच्या नावावर 41 हजार कोटींची संपत्ती होती. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)

 





Read More