PHOTOS

बचत हवी तर अशी! ब्रेझा, पंचला टक्कर देतेय ह्युंडाईची नवी कार; किंमत आता पाहून घ्या

'हो' असेल तर, ह्युंडईनं तुमच्यासाठी एक अफलातून पर्याय आणला आहे. हा पर्याय तुम्हाला कार चालवण्...

Advertisement
1/7
भारतीय ग्राहक
भारतीय ग्राहक

Hyundai Exter : भारतातील रस्ते, भारतीय ग्राहकांची वेतन मर्यादा या आणि अशा अनेक गोष्टी अंदाजात घेत ह्युंडई या कंपनीकडून भारतीय कारप्रेमींच्याच दृष्टीनं डिझाईन केलेली Exter ही एसयुव्ही लाँच केली जात आहे. 

2/7
स्वस्त एसयुव्ही
स्वस्त एसयुव्ही

आतापर्यंत ह्युंडईच्या एसयुव्हींपैकी ही सर्वाधिक स्वस्त एसयुव्ही आहे. पाच विविध व्हेरिएंटमध्ये ही कार तुम्हाला उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 40 वेगवेगळे फिचर्स मिळणार आहेत. 

 

3/7
बुकिंग अमाऊंट
बुकिंग अमाऊंट

1.2 लीटर कप्पा इंजिन असणाऱ्या ह्युंडई एक्स्टरसाठी 11 हजार रुपयांची बुकिंग अमाऊंट द्यावी लागणार आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं ही कार बुक करू शकता. त्यामुळं ही एक आनंदाचीच बाब. 

 

4/7
कारची किंमत
कारची किंमत

किमतीचं सांगावं तर, या कारची एक्स शोरूम किंमत 6 ते 10 लाख रुपयांच्या घरात आहे. ही देशातील सर्वात स्वस्त एसयुव्ही असेल असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. 

 

5/7
इंजिन
इंजिन

ह्युंडई एक्स्टरच्या इंजिनमधूनन 83hp ची पॉवर आणि 114Nm चा टॉर्क जनरेट केला जाईल. या कारमध्ये तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिर गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 

6/7
सुरक्षितता
सुरक्षितता

प्रवाशांच्या गरजांसोबतच कंपनीकडून त्यांच्या सुरक्षिततेलाही केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. कारमध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. तर, कारच्या पाचही व्हर्जनमध्ये जास्तीत जास्त सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. 

7/7
किंमत आणि फिचर्स
किंमत आणि फिचर्स

किंमत आणि फिचर्स पाहता आता तुम्ही येत्या काळात नवी कार खरेदी करु इच्छिता आणि तुम्हाला बजेटचीही चिंता सतावत असेल तर हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. (छाया सौजन्य- ह्युंडई)

 





Read More