PHOTOS

10 हजारांहून कमी किंमतीत मिळतोय 'हा' 5G फोन! Special Sale फक्त काही दिवस; पाहा फिचर्स

सध्या सुरु असलेल्या एका विशेष सेल अंतर्गत हा फोन अगदी 10 हजार रुपयांच्या खाली उपलब्ध असून सेलचे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या फोनचे...

Advertisement
1/9

फ्लिपकार्टवर आता प्रजासत्ताकदिनानिमित्त रिपलब्लिक डे सेल सुरु होत आहे. या सेलअंतर्गत अनेक फोनवर घसघशीत सूट मिळत आहे.

2/9

13 तारखेपासून 19 तारखेपर्यंत फ्लिपकार्टवर ही ऑफर सुरु आहे. या सेलमध्ये थेट डिस्काऊंटबरोबरच विशेष बँक ऑफर्सही आहेत.

3/9

तुम्ही पण या सेलअंतर्गत एखादा चांगला 5 जी फोन शोधत असाल तर सॅमसंगचा गॅलेक्सी एफ14 5G फोनचा विचार करता येईल. हा स्वस्तात मस्त फोन फारच उत्तम आहे.

4/9

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5G च्या बेस व्हिरिएंट 10,490 रुपयांना उपलब्ध आहे. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसहीत हे व्हेरिएंट उपलब्ध आहे.

5/9

आयसीआयसीआय बँकेचं कार्ड असलेल्यांना या फोनवर 10 टक्के सूट मिळत आहे. म्हणजे या फोनची किंमत 10 हजारांखाली जाईल.

6/9

6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसहीतचं व्हेरिएंट 11,490 रुपयांना उपलब्ध आहे. यावरही बँक ऑफर असून हा फोन अधिक स्वस्त मिळू शकतो.

7/9

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5G मध्ये 6.6 इंचांचा फूल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन ऑक्टाकोअर Exynos 1330 प्रोसेसरवर काम करतो.

8/9

50 मेगपिक्सल+2 मेगापिक्सल रेअर कॅमेरा सेटअप सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5G मध्ये आहे. 

9/9

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5G ची बॅटरी 6000 एमएएचची आहे. हा फोन जांभळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. 





Read More