PHOTOS

पोटावरील स्ट्रेच मार्क्स घालवायचे आहेत? मग 'हे' घरगुती उपाय एकदा करुन पाहा

Tips: पोटावरील स्ट्रेच मार्क्स घालवायचे आहेत? मग 'हे' घरगुती उपाय एकदा करुन पाहा. अनेक महिला या स्ट्रेच मार्क्समुळे...

Advertisement
1/5
नारळाचे तेल आणि बदाम तेल
नारळाचे तेल आणि बदाम तेल

स्ट्रेच मार्क्स काढून टाकण्यासाठी नारळाचे तेल आणि बदाम तेल खुप उपयुक्त आहे. कारण हे तेल त्वचेसाठी चांगले असते. तसेच यात फॅटी ऍसिड असल्यामुळे ते त्वचेच पोषण करतं. रोज या तेलाने मालिश केल्यास खूप फायदा होतो.  

 

2/5
साखर
साखर

बदाम तेलात थोडी साखर, लिंबाचा रस टाकून त्याचा स्क्रब तयार करुन घ्या. हा स्क्रब ज्या ठिकाणी स्ट्रेच मार्क्स आहेत, तिथे हळूवारपणे लावा. आठवड्यातून 2-3 वेळा हे केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होऊ लागतात.

3/5
कोरफड
कोरफड

 कोरफड हे त्वेचेसाठी उपयुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन ए आणि ई असल्यामुळे ते गुणकारी मानले जाते. कोरफडच्या आतले गर काढून स्ट्रेच मार्क्सवर 15 मिनिटे लावा. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्या. 

4/5
बटाटा
बटाटा

बटाट्याचा रस काढून कापसाच्या साहाय्याने स्ट्रेच मार्क्सवर लावा. त्यामुळे शरीरावर असलेले स्ट्रेच मार्क्स हळूहळू निघून जातील. 

5/5
चंदन आणि हळद
चंदन आणि हळद

त्वचेसाठी सगळ्या फायदेशीर आणि घरगुती उपाय म्हणजे चंदन आणि हळदीचा लेप. हा लेप एकत्र मिक्स करुन स्ट्रेच मार्क्सवर लावावं. हे सर्व उपाय घरगुती असल्यामुळे वापरण्यासाठी अगदी सोपे आहेत.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)





Read More