PHOTOS

Pure Gold कसं ओळखाल? आताच पाहा सोपी पद्धत

रताना अनेकजण म्हणूनच अतिशय सावधगिरीनं ते पारखून घेताना दिसतात. पण, तुम्हाला खरंच सोन्याची शुद्धता...

Advertisement
1/7

पण, तुम्हाला खरंच सोन्याची शुद्धता पारखता येते का? 

2/7

घरात शुभकार्य असो, एखाद्याला भेट देणं असो किंवा आणखी काही. सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल. बऱ्याचदा काही मंडळी सोन्याच्या नाण्यांनाही पसंती देतात. 

3/7

सोन्याची शुद्धता कॅरेट्समध्ये पारखली जाते. असं म्हणतात की 24K सोनं सर्वाधिक शुद्ध असतं. 

4/7

तुम्हीआम्ही खरेदी करतो ते सोनं, सहसा 18 ते 22 कॅरेटदरम्यान असतं. त्याला आणखी भरीव करण्यासाठी यामध्ये इतर धातू मिसळले जातात. 

 

5/7

बऱ्याच रासायनिक प्रक्रियांचा वापर करत सोन्याची शुद्धता पडताळता येते. 

6/7

तुमचं सोनं शुद्ध आहे की त्यात इतर धातू मिसळण्यात आले आहेत हे सांगणारा आणखी एक पुरावा म्हणजे हॉलमार्क. जे भारत सरकारकडून प्रमाणित केलेलं असतं. 

7/7

1 जुलै 2021 पासून सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांवर असणाऱ्या हॉलमार्कवर बीआयएस लोगो, शुद्धता/ सुंदरता ग्रेड, सहा अंकी अल्फान्यूमरिक कोड म्हणजेच HUID पाहायला मिळतो. 





Read More