PHOTOS

Cheapest Flight Tickets For Kokan: ST चा संप, लक्झरीची मुजोरी त्यात ट्रेन फुल्ल; फक्त 1680 रुपयात विमानानं गाठा आपलो कोकण!

Advertisement
1/8
Flight to Kokan: ST चा संप, लक्झरीची मुजोरी त्यात ट्रेन फुल्ल; फक्त 1680 रुपयात विमानानं गाठा आपलो कोकण!
Flight to Kokan: ST चा संप, लक्झरीची मुजोरी त्यात ट्रेन फुल्ल; फक्त 1680 रुपयात विमानानं गाठा आपलो कोकण!

Flight to Kokan:एसटीचा खोळंबा झाल्यानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झालेयत. अनेक चाकरमान्यांनी एसटीची बुकींग करुन ठेवलीय. पण एसटी कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिल्याने कोकणात जायचं कसं हा प्रश्न पडलाय. त्यात प्रत्येक सिझनप्रमाणे खासगी गाड्यांनी आपले दर दुपट्ट केल्यायत. त्यामुळे लक्झरीनं गावी जाणं सर्वसामान्या परवडत नाहीय.

2/8
गाड्यांची तुफान गर्दी
 गाड्यांची तुफान गर्दी

पुढच्या 2 दिवसात मुंबई-गोवा महामार्गावर कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांची तुफान गर्दी असेल. त्यामुळे खासगी गाडीने जाणंही अनेकांना परवडत नाही. 

3/8
विमानाने जाण्याचा विचार?
विमानाने जाण्याचा विचार?

तुम्ही कधी कोकणात विमानाने जाण्याचा विचार केलाय का? या सर्व गोंधळात तुम्हाला वेळ आणि त्रास वाचवायचा असेल तर विमानाचं तिकिट परवडू शकतं. कसं ते समजून घेऊया.  

4/8
एसटीचा संप
एसटीचा संप

मुंबई ते सिंधुदुर्ग या कोकणच्या मार्गावर एसटीचं तिकिट 1 हजार ते 1500 रुपयांपर्यंत आहे. पण एसटीचं रिझर्व्हेशन आधीच फुल्ल झालंय. त्यात एसटीचा संप कधी मिटेल त्यावर प्रवास ठरवावा लागणार आहे.

5/8
रेल्वेचं रिझर्व्हेशनदेखील फुल्ल
 रेल्वेचं रिझर्व्हेशनदेखील फुल्ल

एसटीप्रमाणे रेल्वेचं रिझर्व्हेशनदेखील फुल्ल झालंय. रेल्वेच्या नव्या नियमाप्रमाणे तुम्ही वेटींग तिकिट घेऊन रिझर्व्हेशनच्या डब्यात चढू शकत नाही. या सिझनला कुटुंबासोबत जनरल डब्यातून प्रवास करणं खूप कठीण असतं.

6/8
खासगी बस
खासगी बस

मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर खासगी बस किंवा लक्झरीचं तिकिट तुम्हाला किमान 2 हजार रुपयांच्या घरात जाईल. लक्झरीचा प्रकार, तुम्हाला मिळणारी सुविधा यानुसार हे दर आणखी वाढू शकतात. 

7/8
विमानाचं तिकिट 1680
 विमानाचं तिकिट 1680

मुंबई ते सिंधुदुर्ग अलायन्स फ्लाइटचं 8 सप्टेंबरचं विमानाचं तिकिट 1680 ते 2224 रुपये इतकं आहे. दुपारी 1 वाजताच्या सुमारासं हे तिकिट दर दाखवताय. वेळेनुसार या तिकट दरात बदल होतो. 

8/8
विमानाचा प्रवास हा 1 तास 30 मिनिटांचा
विमानाचा प्रवास हा 1 तास 30 मिनिटांचा

5 सप्टेंबरचं एअर इंडियाचं मुंबई ते गोवा हे तिकिट 2598 रुपये तर इंडिगोचं तिकिटं 2 हजार 886 रुपये आहे. 4 सप्टेंबर दुपारी 1 वाजता हे दर दाखवत होते.सिंधुदुर्ग ते मुंबई परतीच्या विमान प्रवास 2 हजारच्या आसपास आहे. यात वेळेनुसार बदल होऊ शकतो. विमानाचा प्रवास हा 1 तास 30 मिनिटांचा आहे. हे सर्व पाहता तुम्हाला विमानाचा प्रवास परवडू शकतो का? हे ठरवता येईल. 





Read More