PHOTOS

Deepika Padukone Diet Plan: खदाडीची हौस पुरवूनही दीपिका कशी राहते Fit and Fine? पाहा तिचा डाएट प्लॅन

h Breakfast Lunch Dinner: दीपिका ही खवय्या आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र खाण्याची आवड आणि वजन ती कसं मेन्टेन...

Advertisement
1/14

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या ऑस्कर्समधील समालोचनासाठी चर्चेत आहे. एलिफंट विस्पर्स ही भारतीय डॉक्युमेंट्री आणि 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याने ऑस्कर्स जिंकण्याबरोबरच दीपिकाच्या समालोचनाचीही चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली.

2/14

तशी दीपिका ही तिच्या फिटनेसमुळे आणि कामामुळे कायचम चर्चेत असते. दीपिका ही फार खादाड व्यक्ती आहे असं तिच्या जवळचे सांगतात. 

3/14

वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड असलेली दीपिका आपली शरीरयष्टी म्हणजेच फिगर आणि वजन कसं मॅनेज करते असा प्रश्न अनेकांना पडतो. 

4/14

मात्र दीपिकाच्या या तारेवरच्या कसरतीमगील रहस्य आहे तिचा सिक्रेट डाएट प्लॅन. 

5/14

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दीपिकाच्या डाएटची काळजी घेणाऱ्या डाएटिशीएनचं नावं आहे पूजा मखिजा. पूजा याच दीपिकाने काय आणि कधी खावे वगैरे यासंदर्भातील काळजी घेतात.

6/14

आपल्या अभिनय आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी दीपिका तिच्या जेवणाबाबतीत कधीच कॉम्प्रमाइज करत नाही.

 

7/14

दीपिकाला पास्ता, चायनिज फूड आणि भारतीय खाद्यपदार्थ आवडतात. खास करुन तिला डाळ आणि भात प्रचंड प्रिय आहे.

 

8/14

रणवीर सिंहची पत्नी असलेल्या दीपिकाच्या आवडत्या स्ट्रीट फूडबद्दल सांगायचं झाल्यास तिला शेवपुरी फार प्रिय आहे. 

9/14

दीपिका स्पेशल डाएट प्लॅन फॉलो करते. प्रसारमाध्यमांच्या वत्तानुसार दीपिका रोज तिच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाणी पाऊन करते.

10/14

ब्रेकफास्ट - नाश्त्यामध्ये दीपिका लो फॅट मिल्क, एग व्हाइट खाते. पर्यायी नाश्ता म्हणून दीपिका दाक्षिणात्य पदार्थांना प्राधान्य देते. यामध्ये उपमा, रवा डोसा आणि इडलीचा समावेश असतो.

11/14

लंच - दुपारच्या जेवणामध्ये दीपिका रोटी, भाज्या, सॅलेड आणि ग्रील्ड मासा असा आहार घेते.

12/14

डिनर - रात्री दीपिका सॅलेड, रोटी आणि भाज्यांचं सेवन करते.

13/14

याचप्रमाणे दीपिका तिच्या आहारामध्ये फळं, नारळपाणी आणि सुक्या मेव्याचाही समावेश करते.

14/14

गोड खाण्यासंदर्भात सांगायचं झाल्यास दीपिकाला डार्क चॉकलेट प्रचंड आवडतं. अनेकदा तिने रात्री मीड नाइट कर्व्हींग झाल्यास म्हणजेच रात्री काही खावसं वाटल्यास डार्क चॉकलेट खाते असं सांगितलं आहे.





Read More