PHOTOS

Right Sleeping Position: डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर!

ा की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर! तुम्ही कोणत्या स्थितीत झोपता यावरही तुमचे आरोग्य अवलंबून ...

Advertisement
1/7
डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर!
डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर!

उत्तम आरोग्यासाठी आठ तासांची झोप गरजेचे असते. झोप पुरेशी व नीट झाली असेल तर संपूर्ण दिवसभराची उर्जा मिळते. मात्र, झोपेचे गणित बिघडले तर संपूर्ण दिवस बिघडतो. तसंच, तुम्ही कसे झोपता यावरही आरोग्याचे गणित अवलंबून आहे. 

2/7
आरोग्यतज्ज्ञ
आरोग्यतज्ज्ञ

 खरंतर कुशीवर झोपणे ही सर्वोत्तम स्थिती मानली जाते. मात्र, कोणत्या उजव्या की डाव्या कोणत्या कुशीवर झोपावे याविषयी आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात, ते जाणून घ्या.

3/7
आयुर्वेदातही नोंद
 आयुर्वेदातही नोंद

तज्ज्ञांच्या मते, डाव्या कुशीवर झोपणे ही सर्वोत्तम बाजू मानली जाते. आयुर्वेदातही याबाबत नोंद आहे. 

4/7
रक्तप्रवाह सुरळीत
रक्तप्रवाह सुरळीत

डाव्या कुशीवर झोपल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारते. छातीत जळजळ होणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसंच, रक्तप्रवाह सुरळीत होऊन हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो. 

5/7
घोरण्याची सवय
घोरण्याची सवय

डाव्या कुशीवर झोपल्याने उजवी नाकपुडी उघडते. त्यामुळं उर्जा आणि पचनशक्ती वाढते. त्याचबरोबर तुम्हाला घोरण्याची सवय असेल तर डाव्या कुशीवर झोपल्यास घोरणेदेखील बंद होते. 

6/7
गरोदर महिला
गरोदर महिला

गरोदर महिलांनाही डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला होता. कारण या स्थितीत झोपल्यामुळं पोटावरील दाब कमी होतो व गर्भातील बाळ सुरक्षित राहते.

7/7
ऑक्सिजनचा पुरवठा
 ऑक्सिजनचा पुरवठा

डाव्या कुशीवर झोपल्याने  शरीरातील सर्व अवयवांना रक्तप्रवाह व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More