PHOTOS

रात्री गरम दुधात टाकून प्या 'हा' एक पदार्थ; सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट

होते. तसंच, सकाळची काम करण्यासाठीही फ्रेश वाटत नाही. अशावेळ काही नैसर्गिक उपायांचा वापर करु...

Advertisement
1/8
रात्री गरम दुधात टाकून प्या 'हा' एक पदार्थ; सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट
रात्री गरम दुधात टाकून प्या 'हा' एक पदार्थ; सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट

खाण्या-पिण्याच्या सवयी, शरीरात पाण्याची कमतरता, व्यायामाचा आभाव आणि आहारात फायबरची कमतरता यामुळं बद्धकोष्ठताची समस्या निर्माण होते. बद्धकोष्ठता असल्यास शौचालयात जोर लावाला लागतो, शौचाल कोरडी होणे, पोट फुगणे, तसंच, गुदद्वाराजवळच्या भागात रक्त येणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागते. 

2/8

बद्धकोष्ठतेवर मात करण्यासाठी काही घरगुती उपायांचा वापरही तुम्ही करु शकता. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी गरम दूधात हा एक पदार्थ टाकून प्यायल्यास खूप फरक जाणवून येईल.

3/8
दूध
दूध

साधारणतः दूधाचा आहारात समावेश केल्यास खूप फायदे मिळतात. दूधात कॅल्शियमची भरपूर मात्रा असते. ज्यामुळं हाडांना बळकटी येते. त्याचबरोबर यात प्रोटीन आणि व्हिटॅमिनचे गुणधर्मही आढळतात. 

4/8
तूप
तूप

तुम्हीदेखील बद्धकोष्ठतेमुळं त्रासलेले असाल तर रात्रीच्या वेळी एक ग्लास गरम दुधात दोन चमचे तूप टाकून प्या. हे दूध प्यायल्यास सकाळी पोट साफ होईल आणि शौचालयात फार जोर काढावादेखील लागणार नाही. 

5/8
लिंबू पाणी
लिंबू पाणी

जर तुम्हाला दुधाची अॅलर्जी असेल तर हे घरगुती उपायदेखील बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय आहेत. रात्री झोपण्याच्या आधी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास सकाळी पोट साफ होते. 

6/8
लिक्विड फुड
लिक्विड फुड

बद्धकोष्ठतेवर जितके जास्त लिक्विड फुडचे सेवन केल्यास तितके जास्त फायदेशीर ठरते. अशातच सूप, गरम पाणी किंवा हर्बल टी पिऊ शकतात. 

7/8
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल

 सकाळच्या वेळीस एक चमचा ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो. 

8/8
(Disclaimer
(Disclaimer

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More