PHOTOS

उन्हाळ्यात चिकन, चहा आणि 'या' पदार्थांचं सेवन टाळा; आरोग्याचे नियम पाळा

oid In Summer: ज्याप्रमाणं प्रत्येत ऋतूच्या अनुषंगानं पोषक आहार घेतल्यामुळं आपल्या शरीराला फायदा होतो, त्याचप्रमाणं काही गोष्ट...

Advertisement
1/9
तळलेलं आणि मसालेदार अन्न
तळलेलं आणि मसालेदार अन्न

तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळं उन्हाळ्यात अपचनाची समस्या भेडसावू शकते. त्यामुळं हे पदार्थ टाळणं योग्य. 

 

2/9
शिळं अन्न
शिळं अन्न

सहसा आदल्या दिवशीचा उरलेला पदार्थ दुसऱ्या दिवशी खाण्यात काही गैर नाही असं अनेकजण म्हणतता. पण, उन्हाळ्यात ही सवय दूर ठेवा. 

 

3/9
रस्त्यावर मिळणारे पदार्थ
रस्त्यावर मिळणारे पदार्थ

हल्ली देशोदेशीचे पदार्थही स्थानिक खाऊगल्ल्यांमध्ये मिळू लागले आहेत. पण, उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी हे बाहेरचं खाणं टाळा.  

 

4/9
चहा आणि कॉफी
चहा आणि कॉफी

चहा आणि कॉफी यांसारख्या पेयांमुळं शरीरातील पाण्याची पातळी खालावते. त्यामुळं उन्हाळ्यात ही पेयं टाळा. 

 

5/9
लोणची
लोणची

सोडियमचं अधिक प्रमाण असणारं लोणचंही शरीरातील पाण्याची पातळी कमी करतं. शिवाय यामुळं अपचनाचा त्रासही उदभवतो. 

 

6/9
सोडा
सोडा

शीतपेय किंवा सोडा उन्हाळ्यात सर्रास प्यायला जातो. पण, यामध्ये असणारं साखरेचं अती प्रमाण शरीरासाठी धोक्याची सूचना असतं. 

 

7/9
मिल्कशेक
मिल्कशेक

उन्हाळ्यात थंडगारस मिल्कशेक पिण्यास अनेकांची पसंती असली तरीही तो शरीराराठी फायदेशीर नाही. यामुळं एका क्षणात शरीरात कॅलरीज वाढतात. परिणामी उच्च रक्तदाबासारख्या समस्याही भेडसावू लागतात. 

 

8/9
भाजलेलं मांस
भाजलेलं मांस

भाजलेलं मांस, चिकन असे पदार्थही उन्हाळ्यात खाणं टाळावं. अशा पदार्थांमुळं पचनसंस्था बिघडते. 

 

9/9
मद्यपान
मद्यपान

मद्यपान करण्यापासून उन्हाळ्यात दूरच राहिलेलं बरं. मद्याच्या सेवनामुळं शरीरातील पाणी घाम आणि इतर माध्यमांतून बाहेर पडून पाण्याची पातळी खालावते. 

 





Read More