PHOTOS

PHOTOS: हेड कॉन्स्टेबल ते सौंदर्यवती; पोलीस ड्युटी करतानाही जोपासला छंद, वय ऐकून बसेल धक्का

्वप्न उराशी बाळगलेले होते. आज जिद्दीच्या जोरावर त्यांनी त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सुजाता शेलार असं या तरुणीचे नाव आहे. हेड कॉन्स्टे...

Advertisement
1/7
PHOTOS: हेड कॉन्स्टेबल ते सौंदर्यवती; पोलीस ड्युटी करतानाही जोपासला छंद, वय ऐकून बसेल धक्का
PHOTOS: हेड कॉन्स्टेबल ते सौंदर्यवती; पोलीस ड्युटी करतानाही जोपासला छंद, वय ऐकून बसेल धक्का

सुजाता शेलार या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहर पोलिस स्थानकात कार्यरत आहेत. 39 वर्षांच्या सुजाता यांनी Miss Maharashtra Glamourous 2023 या किताब पटकावला आहे. 

2/7
छंद जोपासला
छंद जोपासला

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, मला आधीपासूनच मॉडलिंगमध्ये करिअर करायचे होते. अर्थशास्त्र विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी फॅशन डिझाइनिंगचा डिप्लोमादेखील केला होता. 

3/7
पोलीस दलात
पोलीस दलात

शेलार यांचे वडिल ड्रायव्हर तर आई गृहिणी असून एक बहिणदेखील आहे. दोघी बहिणींपैकी एकीने पोलीस दलात सहभागी व्हावे, अशी इच्छा होती. शेलार यांनी आईची इच्छा पूर्ण करत पोलीस दल जॉइन केले. सुजाता शेलार यांना कराटेमध्ये ब्राउन बेल्टदेखील मिळाला आहे. तर, सध्या त्या कायद्याचा अभ्यासदेखील करत आहेत. 

4/7
इंग्रजीची भिती
इंग्रजीची भिती

सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्याची त्यांची इच्छा खूप वर्षांपासूनची होती. मात्र भाषेचा अडसर यामुळं त्यांनी भाग घेण्याचे टाळले. सुजाता यांना इंग्लिश बोलण्यास अडथळे येत असल्याने त्यांनी स्पर्धेत भाग घेण्याचे टाळले. 

5/7
भाषेची अडसर
भाषेची अडसर

मात्र, भाषेची भीती दूर सारत 2023च्या सौंदर्यस्पर्धेत त्यांनी भाग घेतला. मराठी शाळेत शिक्षण झाल्याने इंग्लिश भाषा बोलणे जड जात असल्याने त्याने नम्रपणे परिक्षकांसमोर कबुल केले आणि हिंदीतच परीक्षकांची उत्तरे देऊन त्यांची मने जिंकली. 

6/7
प्रोत्साहन मिळाले
प्रोत्साहन मिळाले

Miss Maharashtra Glamourous 2023 जिंकल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पोलीस दलातील वरिष्ठांनी व सहकाऱ्यांनी या स्पर्धेसाठी खूप प्रोत्साहन दिले, असं त्यांनी सांगितले. 

7/7
स्पर्धा जिंकल्यानंतर काय बदल झाला
स्पर्धा जिंकल्यानंतर काय बदल झाला

सुजाता शेलार म्हणतात की, ही स्पर्धा जिंकण्यासाठी खूप जणांनी प्रोत्साहन दिले होते. तसंच स्पर्धा जिंकल्यानंतर अनेक कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. इन्स्टाग्राम फॉलोअर्सदेखील वाढले. काहीही अशक्य नाही आणि वय हा फक्त एक आकडा आहे, हे माझं जीवनाचे सूत्र आहे. 

 





Read More