PHOTOS

महाराष्ट्राला आज मिळणार पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'; प्रतीक्षा आणि वैष्णवीमध्ये अंतिम लढत

ri: महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण? होणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.सांगलीतल्या जिल्हा क्रीडा...

Advertisement
1/6

सांगलीमधल्या जिल्हा क्रीडा संकुल मिरज इथे राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या महिलांच्या राज्यस्तरीय "महाराष्ट्र केसरी"स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

2/6

या कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यातील 45 महिला संघातील 450 महिला कुस्ती मल्ल सहभागी झाले आहेत. गुरुवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे. 

 

3/6

या स्पर्धेत बाजी मारणाऱ्या विजेत्या महिला मल्लास चांदीची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या वाहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा कोण पटकविणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

4/6

सांगलीच्या प्रतीक्षा आणि कल्याणची वैष्णवी यांच्यात होणार महिला महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत

5/6

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धाचेची अंतिम लढत ही सांगलीची प्रतीक्षा बागडे आणि कल्याणची वैष्णवी पाटील या दोघांमध्ये होणार आहे

6/6

दुसरीकडे मात्र कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ नियोजन पाहायला मिळाले आहे. स्पर्धेच्या ठिकाणी स्ट्रीट लाईट चालू नसल्याने अंधारातून वाट काढावी लागत आहे. तर पिण्याची पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे पाहायला मिळत आहे.





Read More