PHOTOS

PHOTO : वडील मजूर, तुटलेल्या भाल्याने सराव; देणग्या गोळा करुन घेतली Javelin, आज आहे ऑलिम्पिकचा चॅम्पियन

Profile : गोल्डन बॉय नीरज चोप्रासोबत सध्या चर्चा सुरु आहे ती पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीमची जोरदार चर्चा सुरु...

Advertisement
1/9

वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा अर्शद नदीम पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला असून त्याने अंतिम फेरीत दोनदा 90 मीटर अंतर पार भाला फेकला. असे करणारा तो जगातील एकमेव भाला फेकणारा खेळाडू ठरलाय. 

2/9

ऑलिम्पिकमध्ये विश्वविक्रम रचत अर्शद नदीमने 32 वर्षांनंतर आपल्या देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून दिलंय. पाकिस्तानचा ऑलिम्पिकमधील पदकांचा इतिहास पाहिला तर शेजारी देशाने शेवटचं पदक हे 1992 मध्ये जिकंल होतं. 1992 बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तान हॉकी संघाने पुरुषांमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर पाकिस्तानला एकही पदक आजपर्यंत मिळालं नव्हतं.  

3/9

अर्शद नदीम ज्या पार्श्वभूमीतून आलाय, त्या पार्श्वभूमीवर जगज्जेता बनणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही. 2 जानेवारी 1997 ला मियां चुनुन इथे जन्मलेल्या अर्शदचं वडील मजूर होते. अर्शदचे प्रशिक्षण घेण्यासाठी वडिलांकडे पुरेसे पैसे नव्हतं, पण मुलाने हार मानली नाही. अर्शद लहान असताना वडिलांसोबत 'नेजाबाजी' पाहायला जायचा. या खेळात अनेक खेळाडू हातात लांबलचक काठी घेऊन जमिनीवर ठेवलेली खूण उचलतात. नदीमला हा खेळ इतका आवडला की त्याने त्यात प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली, पण दरम्यानच्या काळात भालाफेकने त्याला आकर्षित केलं. 

4/9

अर्शदला भालाफेकच्या प्रशिक्षणाचाही फायदा झाला. शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेदरम्यान अर्शदने भाला फेकला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जेव्हा शाळेचे प्रशिक्षक रशीद अहमद यांनी अर्शदची प्रतिभा लक्षात घेतली तेव्हा त्यांनी प्रशिक्षणाला सुरू केली. 

5/9

आठ भावंडांमध्ये नदीम हा तिसरा आहे. वडील मजुरीचे काम करून 400-500 रुपये कमावायचे. असे असतानाही नदीमसाठी तूप आणि दुधाची व्यवस्था करण्यात आली. रिपोर्टनुसार, अर्शद नदीमला लहानपणापासूनच खेळाची आवड आहे. टेप बॉल क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळत तो खेळायचा. 

6/9

घरची परिस्थिती पाहून अर्शदचे स्वप्न सरकारी नोकरीचे होतं. त्याने स्पोर्ट्स कोटा अंतर्गत पाकिस्तान वॉटर अँड पॉवर डेव्हलपमेंट अथॉरिटीसाठी चाचण्या देखील दिल्या होत्या. मात्र त्याच्या प्रतिभेची चाचणी पाकिस्तानच्या स्टार भालाफेकपटू सय्यद हुसैन बुखारीने केली. सय्यद बुखारी यांनी अर्शद नदीमला सरकारी नोकरी मिळवून दिली. यासोबतच अर्शदला प्रशिक्षण सुरू ठेवण्यास सांगण्यात आलं. 

7/9

अर्शदला पॅरिस ऑलिम्पिकच्या प्रशिक्षणासाठी देणगी गोळा करायची होती. त्याचे मित्र, गावातील लोक आणि नातेवाईकांनी मिळून पैसे गोळा केला. परिस्थिती अशी होती की अर्शदला जुना खराब झालेला भाला घेऊन पॅरिस ऑलिम्पिकसाठी सराव करावा लागला. 

8/9

पॅरिस ऑलिम्पिकसाठी रवाना होण्यापूर्वी अर्शद नदीमने पाकिस्तान सरकारकडे आपली व्यथा मांडली होती. अनेक वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळत असतानाही नवीन भाला खरेदी करू शकलेला नाही. जुन्या आणि जीर्ण झालेल्या भाल्यासह त्याने प्रशिक्षण सुरू ठेवले. त्याला नवीन भाला देण्याची विनंतीही त्यांनी पाकिस्तान सरकारला केली होती.

9/9

अर्शद नदीम हा प्रवास सोपा नव्हता. पाकिस्तानसारख्या देशातून येऊन ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर पोहोचणे खूप कठीण होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचे केवळ 7 खेळाडू सहभागी होण्यासाठी आले होते. यावरून नदीमचा हा विजय किती मोठा आहे याची कल्पना येऊ शकते. त्याने आपल्या देशाचा 32 वर्षांचा ऑलिम्पिक दुष्काळ संपवलाय. 





Read More