PHOTOS

नितीन देसाईच यंदा उभारणार होते 'लालबागचा राजा'चा मंडप; तयारीचे Photos केलेले शेअर

ादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी एन. डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केली. नितीन देसाई हे गणरायाचे मोठे भक्त होते. त्यांच्या सोशल मीडि...

Advertisement
1/14

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

2/14

देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गळफास घेऊन नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

3/14

4 जुलै 2023 रोजी नितीन देसाईंनी लालबागच्या राजाच्या मंडपाचं आणि सेटचं काम सुरु केलं होतं.

4/14

मंडप पूजन आणि सजावटीला सुरुवात करण्याआधी केलेल्या पूजेचे फोटो नितीन देसाईंनी पोस्ट केले होते.

5/14

नितीन देसाई यांनी चार आठवड्यांपूर्वीच लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळासाठी 2023 चा सेट उभारण्यासाठी सुरुवात केलेली.

6/14

लालबागच्या राजाच्या 90 व्या वर्षीच्या मंडप पूजन आणि सजावटीचा श्री गणेशा आज संपन्न झाला, अशी कॅप्शन नितीन देसाईंनी या फोटोला दिला होता. ही पोस्ट त्यांनी 4 जुलै रोजी केली होती.

7/14

लालबागच्या राजाचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो, अशा कॅप्शनसहीत नितीन देसाई यांनी हे फोटो शेअर केले होते.

8/14

2023 च्या थीमनुसार नितीन देसाई यांनी लालबागच्या राजाच्या सेटचं डिझाइनही तयार केलं होतं.

9/14

मागील अनेक वर्षांपासून नितीन देसाईच लालबागच्या राजाच्या मंडपाचं आणि संपूर्ण सेटचं डिझाइन करायचे.

10/14

नितीन देसाई दरवर्षी न चुकता लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी जायचे.

11/14

नितीन देसाई यांनी मागील वर्षीही लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये दर्शनासाठी गेलेले असतानाचे फोटो पोस्ट केले होते.

12/14

नितीन हेच लालबागच्या राजाच्या मंडपाचे आणि सेटचे प्रमुख डिझायनर असल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांचा घरोब्याचे संबंध होते.

13/14

मागील वर्षी लालबागच्या राज्याच्या दर्शन घेतानाचे काही फोटो त्यांनी पोस्ट केले होते.

14/14

नितीन देसाईंनी लालबागच्या राजाच्या पायावर नतमस्तक झाल्याचा फोटोही पोस्ट केला होता.





Read More