PHOTOS

सायकल की वॉक, गुडघ्यांच्या बळकटीसाठी सर्वोत्तम व्यायाम कोणता?

Knees Health: गुडघ्यांच्या आरोग्यांसाठी सायकल चालवणे की पायी चालणे यादोघांपैकी सर्वोत्तम व्यायाम कोणता हे आज जाणून घेऊया.

...
Advertisement
1/7
सायकल की वॉक, गुडघ्यांच्या बळकटीसाठी सर्वोत्तम व्यायाम कोणता?
सायकल की वॉक, गुडघ्यांच्या बळकटीसाठी सर्वोत्तम व्यायाम कोणता?

सायकल चालवणे किंवा सकाळ -संध्याकाळ पायी चालणे हे दोन्ही व्यायाम शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळं हृद्याचे आरोग्य निरोगी राहते, वजन नियंत्रणात राहते तसंच मेंटल हेल्थदेखील निरोगी राहते यासारखे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. मात्र गुडघ्यांसाठी कोणता व्यायाम बेस्ट आहे. हे ठरवायचे झाल्यास अनेकजण विचारात पडतात. गुडघ्यांसाठी सायकल चालवणे व पायी चालणे या व्यायामाचे गुणे हे वेगवेगळे आहेत. सायकल चालवणे किंवा चालणे या पैकी गुडघ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. हे जाणून घेऊया.

2/7
सायकल चालवण्याचे फायदे
सायकल चालवण्याचे फायदे

जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा तुमचे पाय पॅडलच्या संपर्कात पाहतात. त्यामुळं गुडघ्याच्या सांध्यावरील ताण कमी होतो. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, सायकल चालवण्याने तुमच्या गुडघ्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

3/7
सायकलवर व्यायाम
सायकलवर व्यायाम

क्लिनिकल रिहॅबिलिटेशनमध्ये प्रकाशित 2021च्या रिपोर्टनुसार, सायकलवर व्यायाम केल्याने ऑस्टियोआर्थराइटिस असलेल्या लोकांमध्ये वेदना कमी होते आणि कार्य सुधारते. 

4/7
सुलभ व्यायाम प्रकार
सुलभ व्यायाम प्रकार

चालणे हा एक नैसर्गिक आणि सुलभ व्यायाम प्रकार आहे. ज्यामुळं गुडघ्याच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.ज्यामुळं सांध्याची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते. गुडघ्याभोवती आधार देणारे स्नायू मजबूत करते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 

5/7
ऑस्टिओपोरोसिस
ऑस्टिओपोरोसिस

चालणे हे गुडघ्याच्या सांध्यावरील भार कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. चालण्यामुळं गुडघ्याच्या सांध्यामध्ये चांगले रक्ताभिसरण होते. चालणे हाडांचे आरोग्य सुधारते आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार कमी होतात. 

6/7
चालणे आणि सायकलिंग फायदेशीर
चालणे आणि सायकलिंग फायदेशीर

गुडघ्याच्या मजबूतीकरणासाठी चालणे आणि सायकलिंग दोन्ही फायदेशीर आहेत. जर गुडघेदुखीमुळं तुम्ही त्रस्त आहात त्यांच्यासाठी चालणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर तुमचे गुडघे निरोगी असतील तर तुम्ही सायकल चालवण्याचाही प्रयत्न करू शकता. गुडघे मजबूत करण्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या गुडघ्यांमध्ये वेदना होत असल्यास, तुमच्यासाठी कोणते व्यायाम सर्वोत्तम आहेत याबद्दल डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.

7/7
Disclaimer:
Disclaimer:

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)





Read More