PHOTOS

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील GST केला कमी, मोबाईल-टीव्ही-फ्रीज होणार स्वस्त?

s Electronics And Mobiles : केंद्र  सरकारने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. घरगुती वारण्याची उपकरणे, मोबाईल फोन, एलईडी, फ...

Advertisement
1/5
जीएसटी केला कमी
जीएसटी केला कमी

केंद्र सरकारने कित्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे.

2/5
काय होणार स्वस्त आणि किती स्वस्त?
काय होणार स्वस्त आणि किती स्वस्त?

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता 27 इंच किंवा त्याहून लहान स्क्रीन साईजच्या टीव्हीवर लागणारा जीएसटी 18 टक्के करण्यात आला आहे. हा पूर्वी 31.3 टक्के होता. 27  इंचाहून मोठ्या टीव्हीच्या जीएसटीसाठी मात्र पूर्वीचाच दर आकारण्यात येईल.  

3/5
मोबाईल
मोबाईल

मोबाईल फोनसाठी देखील यापूर्वी 31.3 टक्के जीएसटी द्यावा लागत होता. मात्र, आता हा कमी करुन केवळ 12 टक्के करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या कंपन्या आपल्या मोबाईलच्या किंमतीत घट करु शकतात. त्यामुळे मोबाईल घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे.  

4/5
घरगुती उपकरणे
घरगुती उपकरणे

फ्रीज, वॉशिंग मशीन, पंखे, कूलर, गीजर अशा कित्येक घरगुती उपकरणांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे. पूर्वी या उपकरणांवर 31.3 टक्के जीएसटी लागू होता. आता तो कमी करून 18 टक्के करण्यात आला आहे. यामध्ये मिक्सर, ज्यूसर, व्हॅक्यूम क्लीनर, व्हॅक्यूम फ्लास्क आणि व्हॅक्यूम व्हेसल्स अशा उपकरणांचाही समावेश आहे.

5/5
एलईडी झाले स्वस्त
एलईडी झाले स्वस्त

एलईडी बल्बच्या जीएसटी टक्केवारीमध्येही कपात करण्यात आली आहे. पूर्वी एलईडी बल्बसाठी 15 टक्के जीएसटी लागू होत होते. आता ते कमी करुन 12टक्के करण्यात आले आहे.





Read More