PHOTOS

ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षेत पास व्हायचंय? या 5 गोष्टी ठेवा लक्षात

ving License:ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घरी बसून ऑनलाइन अर्ज करता येतो. पण कायमस्वरूपी ड्र...

Advertisement
1/7
ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षेत पास व्हायचंय? या 5 गोष्टी ठेवा लक्षात
ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षेत पास व्हायचंय? या 5 गोष्टी ठेवा लक्षात

Driving license Test: आजकाल प्रत्येकजण बाईक किंवा कार घेण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे गाडी चालवणे ही सामान्य गोष्ट बनलीय. पण असुरक्षित गाडी चालवणाऱ्यांमुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढताना दिसते. त्यामुळे वाहनांचे नियम माहिती असणे आवश्यक असते.

2/7
ड्रायव्हिंग लायसन्स
ड्रायव्हिंग लायसन्स

गाडी चालवण्याआधी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असते. त्यासाठी कसा अर्ज करायचा? ही परीक्षा कशी उत्तीर्ण व्हायची? हे अनेकांना माहिती नसते. 

3/7
योग्य रितीने चालवणे
योग्य रितीने चालवणे

गाडी नुसती चालवता येणे आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य रितीने चालवता येणे यात फरक आहे. ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी, गाडी योग्यरित्या चालवता यायला हवी. यासाठी तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये किंवा इतर कोठही ड्रायव्हिंग शिकू शकता. असे असले तरी ड्रायव्हिंगचा सराव खूप महत्वाचा आहे. खूप सराव केल्याने ड्रायव्हिंग कौशल्ये सुधारतात आणि ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण करणे सोपे होते.

4/7
ड्रायव्हिंग टेस्टचा सराव
ड्रायव्हिंग टेस्टचा सराव

ड्रायव्हिंग चाचणी दरम्यान प्रशिक्षक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कार चालवण्यास सांगू शकतो. त्यामुळे ड्रायव्हिंग परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला सराव गरजेचा आहे.

5/7
सराव कराल तीच गाडी घ्या
सराव कराल तीच गाडी घ्या

तुम्ही ज्या कारवर सराव केला आहे तिच गाडी टेस्टवेळी घ्या. अन्यथा तुमचा गोंधळ उडू शकतो. त्या गाडीच्या पार्टबद्दल तुम्हाला माहिती झालेली असते.यामुळे वाहन चालवणे आणि चाचणी उत्तीर्ण करणे सोपे होते.

6/7
रिलॅक्स राहा
रिलॅक्स राहा

ड्रायव्हिंग चाचणी दरम्यान गोंधळून जाऊ नका. मन शांत ठेवा आणि रिलॅक्स राहा. गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण होण्यास मदत करते.

7/7
गाडीची स्थिती
गाडीची स्थिती

ड्रायव्हिंग चाचणीसाठी तुम्ही जी कार घ्याल ती योग्य स्थितीत असेल याची काळजी घ्या. गाडीची सर्व कागदपत्रे स्वत:जवळ बाळगा. यासोबतच सर्व महत्त्वाची कागदपत्रेही आपल्याकडे ठेवावीत. यामुळे ड्रायव्हिंग टेस्ट दरम्यान कोणतीही अडचण येणार नाही. 





Read More