PHOTOS

PHOTO: सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी स्मार्टफोनमध्ये करा या सेटिंग्स, हॅकर्सलाही फुटेल घाम

Safe from Cyber Attacks: आजकाल स्मार्टफोन हे सगळ्यांसाठी एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे. ज्यामध्ये आपण आपला महत्त्वाचा डेटा स्टोअर करून ...

Advertisement
1/7
ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा
ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेहमी नवीन ऑपरेटिंग सिस्टम अपडेच करत रहा. जसे की Android किंवा iOS या सारख्या सिस्टम वापरा. या अपडेट्समध्ये सुरक्षा अपडेट समाविष्ट असतात जे हॅकर्सपासून तुमच्या स्मार्टफोनचे संरक्षण करतात.

2/7
मजबूत पासवर्डचा वापर करा
मजबूत पासवर्डचा वापर करा

तुमच्या फोन, ॲप्स आणि ईमेलसाठी एक मजबूत पासवर्ड तयार करा. पासवर्डमध्ये अक्षरे, संख्या आणि विशेष चिन्हांचाही समावेश करा, त्यांमुळे तुमचा पासवर्ड अजून मजबूत होईल. पण प्रत्येक ॲप आणि खात्यासाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवा.

3/7
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा (Two-Factor Authentication)
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा (Two-Factor Authentication)

हा एक अधिकचा सुरक्षा स्तर आहे जो तुमचे अकाउंट हॅक होण्यापासून सुरक्षित करतो. यामध्ये तुमच्या पासवर्ड व्यतिरिक्त तुम्हाला एक अधिकचा कोडही टाकावा लागेल. ज्यामुळे तुम्ही लॉगिन केल्यास तुमच्या स्मार्टफोनवर हा सुरक्षा कोड पाठवला जाईल. 

4/7
माहित नसलेल्या सोर्सवरून अॅप्स इंस्टॉल करू नका
माहित नसलेल्या सोर्सवरून अॅप्स इंस्टॉल करू नका

कधीही अ‍ॅप्स इंस्टॉल करताना Google Play Store किंवा Apple App Store वरूनच डाउनलोड करा. अज्ञात स्त्रोतांवरून किंवा थर्ड पार्टी ॲप स्टोअरमधून ॲप्स डाउनलोड केल्याने तुमच्या स्मार्टफोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होण्याचा धोका असतो. 

5/7
सार्वजनिक Wi-Fiचा वापर करताना सावधगिरी बाळगा
सार्वजनिक Wi-Fiचा वापर करताना सावधगिरी बाळगा

सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कचा वापर करत असताना बँकिंग डेटा किंवा पासवर्ड यासारख्या संवेदनशील माहितीमध्ये प्रवेश करू नका. सार्वजनिक वाय-फायच्या नेटवर्कमध्ये प्रवेश करताना VPN वापरण्याचाही विचार करा.

6/7
ब्लूटूथ आणि वाय-फाय बंद ठेवा
ब्लूटूथ आणि वाय-फाय बंद ठेवा

आपण फोनमधले ब्लूटूथ किंवा वाय-फाय वापरत नसाल तेव्हा ते बंद करून ठेवा. 

7/7
अनावश्यक परवानगी देणे टाळा:
अनावश्यक परवानगी देणे टाळा:

मोबईलमध्ये इंस्टॉल केलेल्या ॲप्सला अनावश्याक परवानग्या देऊ नका. त्यामुळे सायबर अटॅकचा धोका वाढतो. 





Read More