PHOTOS

Indian Cricketer Acting in Serial: क्रिकेटला रामराम? आता TV मालिकेत दिसणार 'हा' धडाकेबाज फलंदाज! पोलिसांच्या वर्दीतील Photos Viral

eter: सोशल मीडियाबरोबरच क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या या खेळाडूला मालिकेच्या सेटवर पाहून त्याच्या चाहत्यांना आश्चर्य...

Advertisement
1/9

तसा तो शोशल मीडियावर फार सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे रिल्स लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात. मात्र तो प्रोफेश्नल क्रिकेटपटू आहे. तरीही तो आता क्रिकेट सोडून खरोखर मनोरंजन क्षेत्राकडे वळतो की काय असा प्रश्न नुकताच त्याने पोस्ट केलेला एक व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

2/9

या व्हिडीओमध्ये हा क्रिकेटपटू चक्क एका मालिकेमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. सिंघम चित्रपटाच्या गाण्यासहीत त्याने मालिकेच्या सेटवरील शुटींगचा एक छोटा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

3/9

आपण ज्या क्रिकेटपटूबद्दल बोलत आहे तो आहे भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन. शिखर खरोखरच एका मालिकेमध्ये झळकणार असून त्याला भूमिकाही त्याच्या फलंदाजीसारखी कडकच देण्यात आली आहे.

4/9

हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'कुंडली भाग्य' या मालिकेमध्ये शिखर धवन पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

5/9

'कुंडली भाग्य' या मालिकेच्या सेटवरील काही फोटो आणि शिखरने स्वत: पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

6/9

'आली रे आली! आता तुझी बारी आली! लवकरच काहीतरी नवं घेऊन येतोय' असं धवनने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

7/9

शिखरने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तो सेटवर दमदार एन्ट्री घेताना दिसत आहे. तो गुंडांना चोप देताना दिसत असून या व्हिडीओला सिंघम चित्रपटाचं गाणं लावण्यात आलं आहे. 

8/9

कुंडली भाग्यमध्ये दिसणाऱ्या अंजुम फकीहने शिखर धवनबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिखर धवन पोलिसांच्या वर्दीमध्ये दिसत आहे. 

9/9

अन्य एका फोटोमध्ये शिखर आणि अंजुमबरोबर कुंडली भाग्यमधील अभिनेता अभिषेक कपूरही दिसत आहे. या फोटोला अंजुमने 'धवन भी और दबंग भी' अशी कॅप्शन दिली आहे.





Read More