PHOTOS

टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर 'या' 9 दिग्गज खेळाडूंची निवृत्ती, कोणी टी20 तून तर कोणी ऑल फॉर्मेटला केलं अलविदा

fter T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 अनेक कारणाने वैशिष्ट्यपूर्ण राहिला. या स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघांनी सहभागी घे...

Advertisement
1/9

टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांची मॅचविनिंग खेळी करणाऱ्या विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं. अंतिम सामन्यानंतर विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कोहलीने 125 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 4188 धावा केल्या आहेत. 

2/9

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तब्बल 17 वर्षानंतर आयसीसी जेतेपद पटकावण्याचं स्वप्न पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मानेही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहितने 159 टी20 सामन्यात  4231 धाव केल्यात. 

3/9

विराट कोहली आणि रोहत शर्माच्या निवृत्तीा काही वेळ होत नाही तोच टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने टी20 फॉर्मेटला अलिवदा करत असल्याचं सांगितलं. जडेजाने 74 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 515 धावा आणि 54 विकेट घेण्याची किमया केली आहे.

4/9

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने टी20 वर्ल्ड कप 2024 आधीच निवृत्तीची घोषणा केली होती. पण ऑस्ट्रेलियावर ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली. वॉर्नरने 110 टी20 सामन्यात 3277 धावा केल्या आहेत. 

5/9

डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज टेन्ट बोल्टने टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात न्यूझीलंडसाठी पापुआ न्यू गिनीविरुद्ध आपला शेवटचा टी20 सामना खेळला. बोल्टने 61 सामन्यात 83 विकेट घेत आपल्या टी20 कारकिर्दीला रामराम केला. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बोल्टने चार सामन्यात 9 विकेट घेतल्या.

6/9

बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटर महमूदुल्लाहने टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच अलिवदा केला आहे. 38 वर्षीय महमूदुल्लाहने बांगलादेशसाठी सात सामन्यात 95 धावा केल्या. क्रिकेट कारकिर्दीत त्याने 138 टी20 सामन्यात  2394 धावा केल्या. शिवाय ऑफ स्पिन गोलंदाजी करत 40 विकेटही त्याच्या नावावर आहेत. 

7/9

नामिबिया क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वीजने टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. वीजने 54 टी20 सामन्यात 624 धावा आणि  59 विकेट घेतल्यात.

8/9

नेदरलँडचा अनुभवी खेळाडू सायब्रांड अब्राहन एंजेलब्रेक्टने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या या 35 वर्षीय क्रिकेटरने 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 280 धावा केल्यात.

9/9

युगांडा क्रिकेट संघाच्या ब्रायन मसाबाने टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर टी20 क्रिकेटमधून अचानक सन्यास घेतला. 32 वर्षीय ब्राययने 61 टी20 सामन्यात 437 धावा केल्या. तसंच त्याच्य नावावर 23 विकेटही जमा आहेत.