PHOTOS

Jaydeep Apte Arrest: कंत्राट कसं मिळालं? कुठे लपलेला? पुतळ्याच्या कपाळावर... 'या' 8 प्रश्नांची उत्तरं देणार आपटे?

ill Ask These Questions: जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली असून कल्याणमधून त्याला पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतलं. 26 ऑगस्टला पुतळ...

Advertisement
1/12

जयदीप आपटेला अटक झाल्याने अनेक प्रश्नांची उत्तर पोलिसांना मिळणार आहेत. हे प्रश्न कोणते आणि कोणत्या गुपितांवरुन पडदा उठणार आहे जाणून घ्या...

2/12

महाराष्ट्र पोलिसांच्या सात तुकड्या मागील काही दिवसांपासून जयदीप आपटेच्या मागावर होत्या. रात्री उशीरा जयदीप आपटेला अटक केल्यानंतर सिंधुदुर्ग क्राइम ब्रांचच्या ताब्यात देण्यात आलं आहे. जयदीपच्या अटकेनंतर पोलिसांना नेमक्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत पाहूयात...

3/12

सिंधुदुर्गमधील मलावण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेल्या पुतळ्याचा मूर्तीकार आणि कंत्राटदार जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे. 26 ऑगस्ट रोजी ही दुर्घटना घडल्यापासून जयदीप आपटे फरार होता. कल्याण पोलिसांनी बुधवारी रात्री त्याला कल्याणमधील घरातून अटक केली. 

4/12

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं काम जयदीप आपटेला कसं मिळालं?

 

5/12

शिल्पकार म्हणून फारसा अनुभव नव्हता तरीही हे इतकं महत्त्वाचं कंत्राट मिळवण्यासाठी जयदीप आपटेला कोणी मदत केली का? केली असेल तर कशी?

 

6/12

26 ऑगस्ट रोजी पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे कुठे फरार झाला? 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान तो नेमका कुठे होता? पळून जाण्यात त्याला कोणी मदत केली?

 

7/12

कोणताही अनुभव नसताना एवढा मोठा पुतळा तयार केल्यानंतर या पुतळ्याच्या रचनेमध्ये काही दोष आहेत, तो कोसळू शकतो किंवा काही विपरित घडू शकते याबद्दल कोणी जयदीप आपटेला काही इशारा प्रत्यक्ष दुर्घटनेपूर्वी दिला होता का?

8/12

मर्यादीत वेळेत पुतळ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जयदीप आपटेवर कोणी दबाव टाकला होता का?

 

9/12

लाखो रुपये खर्च करुन जो पुतळा उभारला त्यासाठी जयदीप आपटेनं नेमकी किती दिवस आधी आणि काय तयारी केली?

 

10/12

पुतळ्याच्या कपाळावरील निशाणीवरुनही वाद सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अमोल मिटकरींनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पुतळा बनवताना जयदीप आपटेने कोणते ऐतिहासिक संदर्भ वापरेल होते याचीही चौकशी पोलीस त्याच्याकडे करु शकतात.

11/12

जयदीप आपटे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यात मैत्री असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. या दोघांच्या कनेक्शनसंदर्भात चौकशीची मागणी राऊत यांनी केली आहे. खरोखरच या आरोपामागे काही तथ्य आहे काय याचीही चौकशी पोलीस करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

12/12

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असताना आता आपटेच्या अटकेमुळे पोलिसांना या प्रकरणामध्ये पुढील तपासासाठीचे बरेच धागेदोरे मिळू शकतील असं सांगितलं जात आहे. 





Read More