PHOTOS

इस्रोमधील शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? सोयीसुविधांचीही बरसात

च्या यशस्वी प्रक्षेपणासह असंख्य भारतीयांच्या महत्त्वाकांक्षाही थेट अवकाशाच्या दिशेनं झेपावल्या. देशासाठी अतिशय ऐतिहासिक अशा या क्षणाचे...

Advertisement
1/7
भारतीयांच्या महत्त्वाकांक्षाही थेट अवकाशाच्या दिशेनं
भारतीयांच्या महत्त्वाकांक्षाही थेट अवकाशाच्या दिशेनं

Isro Jobs Salary : चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणासह असंख्य भारतीयांच्या महत्त्वाकांक्षाही थेट अवकाशाच्या दिशेनं झेपावल्या. देशासाठी अतिशय ऐतिहासिक अशा या क्षणाचे साक्षीदार तुम्हीआम्ही सगळेच झालो

2/7
मोहिमेसाठी मोलाचं योदगान देणारे अनेक चेहरे
 मोहिमेसाठी मोलाचं योदगान देणारे अनेक चेहरे

चांद्रयान 3 मोहिमेच्या निमित्तानं या मोहिमेसाठी मोलाचं योदगान देणारे अनेक चेहरे समोर आले. ज्यामध्ये शास्त्रज्ञांनी आपल्या संपूर्ण टीमचं तोंड भरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. याच कारणामुळं आणखी एक चर्चा रंगली ती म्हणजे या शास्त्रज्ञांच्या नोकऱ्यांची आणि इस्रोतून त्यांना मिळणाऱ्या पगाराची. 

 

3/7
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) वतीनं जेव्हा अध्यक्ष आणि चांद्रयान 3 मोहिमेचं नेतृत्त्वं करणाऱ्या शास्त्रज्ञांनी माध्यमांना संबोधित केलं त्यावेळी या मंडळींची कर्तगारी अनेकांचेच डोळे दीपवून गेली. काहींना तर प्रश्नच पडला, इतक्या कोट्यवधींच्या मोहिमांचं नेतृत्त्वं करणाऱ्या या मंडळींना किती पगार असेल बरं? (chandrayaan 3 ISRO Salary how much scientis get paid )

 

4/7
दर महिन्याला मिळणारं वेतन...
दर महिन्याला मिळणारं वेतन...

उपलब्ध माहितीनुसार इस्रोमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणीच्या लेव्हल 10 मध्ये Scientist ‘SC’ पदी सेवेत असणाऱ्यांना दर महिन्याला किमान 56,100 रुपये इतकं वेतन अपेक्षित असतं. नोकरीवर रुजू झालेल्या उमेदवारांना प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ISRO सायंटिस्टचं पद, त्यासाठीचे भत्ते आणि इतर सुविधांचा लाभ घेता येतो. 

 

 

5/7
पगारातील भत्ते...
पगारातील भत्ते...

इस्रोमध्ये नोकरी लागल्यास पदानुसार मिळणारा पगार आणि त्यासाठी भत्ते यांची आखणी केली जाते. जिथं सुरुवातीचं वेतन 56100 रुपये प्रतिमहिना असून, बंगळुरू येथे इच्छुकांना नोकरीसाठी जावं लागतं. भत्त्यांचं सांगावं तर, या पगारांमध्ये घर भाडं, मगाहाई भत्ता, वैद्यकिय भत्ता, वाहतूक भत्ता, विमा, प्रवास सवलती, पेन्शन योजना, हाऊस बिल्डींग अलाऊन्स या आणि अशा इतर भत्त्यांचा समावेश असतो. 

 

6/7
पदानुसार कामाची जबाबदारी
पदानुसार कामाची जबाबदारी

इस्रोमध्ये रुजू झालेल्यांना त्यांच्या पदानुसार कामाची जबाबदारी सोपवण्यात येते. ज्याचा उल्लेख त्यांच्या Job Profile मध्ये केला जातो. इस्रोकडून राबवण्यात येणाऱ्या उपग्रह प्रक्षेपण, अवकाश निरीक्षण या आणि अशा अनेक मोहिमांमध्ये या मंडळींना योगदान देता येतं. जिथं विज्ञान शाखेतील विविध विभागांसाठीचे शास्त्रज्ञ आपलं कसब पणाला लावतात. 

 

7/7
प्रशिक्षण शिबिरं
प्रशिक्षण शिबिरं

इस्रोमध्ये तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील अभ्यास पूर्ण केलेली मंडळी विविध संशोधनं, विकासकामं आणि तत्सम गोष्टींसाठी निवडली जातात. वेळोवेळी वैयक्तिक कामगिरीच्या बळावर त्यांना पदोन्नती आणि पर्यायी पगारवाढीचाही लाभ मिळतो. शिवाय वेळोवेळी इस्रोतर्फे अद्ययावर तंत्रज्ञान आणि अवकाशाशाशी संबंधित जागतिक स्तरावरील प्रशिक्षण शिबिरांमध्येही सहभागी होण्याची संधी मिळते. 

 





Read More