PHOTOS

राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चनांची घ्यायची होती जागा! जिद्दी दिग्दर्शकाने नाकारलं, विनोद खन्ना यांनी तोडला 'अभिमान'

राजेश खन्ना यांना एका चित्रपटात अमिताभ बच्चन यांची जागा घ्यायची होती. मात्र जिद्दी दिग्दर्शकाने शर्त नाकारली आणि विनोद खन्नांची वर्णी ...

Advertisement
1/8

1977 मध्ये रिलीज झालेला 'परवरिश' हा असा चित्रपट अमिताभ बच्चन आणि विनोद खन्नामुळे तुफान गाजला होता. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मनमोहन देसाई आणि अमिताभ बच्चन यांचा हा पहिलाच चित्रपट होता. 

2/8

या चित्रपटानंतर या दोघांनी एकापाठोपाठ अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. जे बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. 

3/8

'परवरिश' मध्ये अमिताभ बच्चन बरोबर विनोद खन्ना, शम्मी कपूर, नीतू सिंग आणि शबाना आझमी हे मुख्य भूमिकेत होते. विनोद आणि अमिताभ या चित्रपटात भाऊ दाखवले होते. 

 

4/8

चित्रपटातील या दोघांचा ब्रोमान्स प्रेक्षकांना खूप आवडला होता. मात्र तुम्हाला जे जाणून आश्चर्य वाटेल की, विनोद खन्ना हा दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हता. 

5/8

या चित्रपटातील विनोद खन्नाची भूमिका पहिले राजेश खन्ना यांना ऑफर देण्यात आली होती. रिपोर्टनुसार राजेश खन्ना यांना किशन सिंग म्हणजे विनोद खन्ना यांची भूमिका नाही तर अमित सिंग म्हणजे अमिताभ बच्चन यांची भूमिका करायची होती. 

6/8

 मात्र दिर्ग्दशकाने नकार दिला आणि राजेश खन्ना त्यांचा मागणीवर ठाम होते. राजेश खन्ना यांच्या त्रासाला कंटाळून दिर्ग्दशकाने विनोद खन्ना आपल्या चित्रपटात घेतलं.

7/8

हा पिक्चर एक अॅक्शन ड्रामा होता, जो पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांच्या अवतीभवती फिरतो. मीडियारिपोर्ट्सनुसार 1.66 कोटींच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 6 कोटींचा गल्ला जमवला होता. 

8/8

त्या काळात हा बॉक्स ऑफिसवर चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. यासोबतच मनमोहन देसाईंच्या त्या वर्षीच्या चार हिट चित्रपटांपैकी हा एक होता. 'चाचा भटिजा', 'धरम वीर' आणि 'अमर अकबर अँथनी' नंतर 'परवरिश' हा चौथा सुपरहिट चित्रपट होता.