PHOTOS

तुमचा विश्वास बसणार नाही पण 'हे' 10 Bollywood सेलिब्रिटी दारुच्या थेंबालाही लावत नाहीत हात

t Drink Alcohol: बॉलिवूड म्हटल्यावर पार्ट्या, मद्यपान आणि आलीशान लाइफस्टाइल यासारख्या गोष्टी आपल्या सर्वांच्याच डोळ्यासमोर येतात. मात्र...

Advertisement
1/21

मनोरंजनसृष्टी म्हटल्यावर पार्ट्या, पब्स, क्लब्ससारख्या गोष्टी ओघाने आल्याच. अशा पार्ट्यांमध्ये मद्यपानसारखी गोष्ट फार सामान्य बाब आहे. मात्र या झगझगत्या दुनियेमध्येही काही कलाकार असे आहेत जे दारुच्या थेंबालाही शिवत नाहीत. याच कलाकारांची यादी पाहूयात...

2/21

मद्याला हातही न लावणाऱ्या कलाकारांच्या यादीत पहिलं नाव आहे अक्षय कुमार. अक्षय हा त्यांच्या फिटनेससाठी ओळखला जातो. 

3/21

आरोग्यासंदर्भातील अनेक गोष्टींची अक्षय आवर्जून काळजी घेतो. काय खावे, काय नाही याची काळजी घेण्याबरोबरच अक्षय धुम्रपान करत नाही आणि मद्यपानही करत नाही. 

4/21

'पिंक', 'थप्पड', 'नाम शबाना', 'बेबी' यासारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. 

5/21

तापसीही तिच्या आरोग्यासंदर्भात फारच जागृक आहे. तापसीही मद्यपान करत नाही.

6/21

अभिनेत्री विद्या बालन तिच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. अनेक चित्रपटांमधील आपल्या हटके भूमिकांनी विद्याने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

7/21

विद्या बालनही तिच्या आरोग्याबद्दल फार जागृक असून ती हेल्थी लाइफस्टाइल फॉलो करते. खाण्यापिण्यासंदर्भात ती फार गोष्टींचं पालन करते. विद्याही मद्यपान करत नाही.

8/21

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आजही तरुण व्यक्तीरेखा चित्रपटांमध्ये साकारतो. 'थ्री इडियट्स'मध्ये त्याने साकारलेली कॉलेज कुमाराची भूमिका चांगलीच गाजली होती.

9/21

आमीर खानही त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी आवर्जून पाळतो. आमीरही मद्यपान करत नाही.

10/21

अभिनेता सोनू सूद हा कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये त्याने केलेल्या मदतीमुळे चर्चेत आला. दाक्षिणात्य चित्रपटांमधील यशानंतर हिंदीमध्येही पाय रोवलेल्या सोनूने अल्पावधीत यश मिळवलेलं नाही. सोनूचा स्ट्रगल मोठा आहे.

11/21

सर्वसामान्य घरातून पुढे आलेल्याने सोनूने मुंबई येऊन स्ट्रगल केला. सध्या तो आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र संपत्ती आल्यानंतरही त्याने आपल्या काही मूलभूत गोष्टी सोडलेल्या नाहीत. यापैकीच एक म्हणजे त्याने पाळलेला दारु न पिण्याचा नियम.

12/21

वेगळ्या धाटणीचे आणि हटके कथानक असलेले चित्रपट करणारा अभिनेता म्हणून आयुष्मान खुरानाची ओळख आहे. 

13/21

आयुष्मान खुरानाने ऑन स्क्रीन अनेकदा मद्यपान, धुम्रपानासंदर्भातील सीन दिले असले तरी तो खऱ्या आयुष्यात या दोन्ही गोष्टी करत नाही. तो त्याच्या आरोग्यासंदर्भात फारच काळजी घेतो. 

14/21

वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव. 

15/21

जेव्हा जेव्हा स्क्रीनवर दिसला तेव्हा चित्रपट हीट ठरला अशी ओळख असलेला राजकुमार रावही फिटनेसबाबतीत फार जागृक आहे. राजकुमारही मद्यपान करत नाही. 

16/21

अभिनेता विकी कौशलची पत्नी अशी नवीन ओळख मिळालेली अभिनेत्री कतरिना कैफही तिच्या फिटनेसमुळे अनेकदा चर्चेत असते.

17/21

कतरिना अनेकदा जीममध्ये व्यायाम करायचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आरोग्याची काळजी घेणारी कतरिनाही मद्यपान करत नाही.

18/21

सध्या आदीपुरुष चित्रपटामधील सितेची भूमिका साकारल्याने चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉन. क्रितीने अनेक चित्रपटांमध्ये लक्षात राहतील अशा भूमिका साकारल्या आहेत.

19/21

'बरेली की बर्फी', 'लुपाछुपी'सारख्या चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली क्रिती सेनॉनही मद्यपान करत नाही.

20/21

बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे ऋतिक रोशन. कहो ना प्यार है या आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच आपल्या लूक्समुळे ऋतिक चर्चेत आहे.

21/21

ऋतिक हा फिटनेससंदर्भात फार काळजी घेतो. डाएट फॉलो करण्याबरोबरच नियमीत व्यायाम करणारा ऋतिकही मद्यपान करत नाही.





Read More