PHOTOS

अविवाहित अभिनेत्री झाली आई; वयाच्या 31 व्या वर्षी अखेर मिळाली प्रेमाच्या माणसाची साथ

त्रपट विश्वातून सध्या एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण, अनेक तरुणांना आपल्या स्मितहास्यानं घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीनं अखेर तिच...

Advertisement
1/7
अविवाहीत असतानाच झाली आई...
अविवाहीत असतानाच झाली आई...

Entertainment News : अविवाहित राहत29 व्या वर्षी एका बाळाची आई झालेल्या आणि सध्या वयाच्या 31 व्या वर्षात असणाऱ्या अभिनेत्रीनं अखेर तिला आयुष्यभराचा जोडीदार मिळाल्याची गोड बातमी सर्वांसमोर आणली आहे. 

 

2/7
खास ठिकाणी प्रपोज
खास ठिकाणी प्रपोज

बर्फाच्छादित डोंगररांगा आणि कडाक्याच्या थंडीमध्ये साखरपुडा करत साथीदारासोबतच्या नात्याला नवं नाव देणारी ही अभिनेत्री आहे, एमी जॅकसन. एमीनं 2019 मध्ये व्यावसायिक जॉर्ज पॅनायिओटुच्या मुलाला जन्म दिला. पण काही मतभेदांमुळं ही दोघं या नात्यात एकत्र राहू शकली नाहीत. अखेर एमी आणि जॉर्जनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

3/7
कोण आहे तो?
कोण आहे तो?

आता म्हणे हीच एमी हॉलिवूड अभिनेता एड वेस्टविकसोबत रिलेशनशिपमध्ये असून, त्याच्यासोबतच्या रिलेशनशिपचा खुलासा तिनं 2022 मध्ये केला होता. त्या दोघांचाही नुकताच साखरपुडा झाला आहे. या खास क्षणाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

4/7
प्रेमाचं नातं...
प्रेमाचं नातं...

एमी आणि एडनं अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. जिथं एडनं गुडघे टेकत एमीपुढं आपलं प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. हा क्षण जणू एका चित्रपटातील दृश्याइतकाच गोड होता. 

5/7
अविस्मरणीय क्षण
अविस्मरणीय क्षण

बर्फाच्छादीत पर्वतांमध्ये असणाऱ्या एका सुरेख अशा पुलावर एमी आणि एड त्यांच्या जीवनातील हा अविस्मरणीय क्षण जगले. त्यांचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयही या क्षणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. 

6/7
Engagment Rings
Engagment Rings

खास दिवशी आणि खास क्षणी एमीनं पांढऱ्या थर्मल कोटला पसंती दिली होती. तर, एडनं ऑलिव्ह ग्रीन आऊटफिट निवडली होती. या दोघांनीही Engagment Rings सुद्धा फ्लाँट केल्या. 

7/7
शुभेच्छांचा वर्षाव
शुभेच्छांचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपण या प्रेमाच्या नात्याला होकार दिल्याचं जाहीरपणे सांगत आनंद व्यक्त केला. ज्यानंतर चाहत्यांनी तिला आणि एडला जीवनातील या नव्या प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. 

 





Read More