PHOTOS

एका मुलाची आई असूनही वयाच्या 41 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री सौंदर्याची खाण

समय का ये पल... थम सा गया है! वयाच्या 41 व्या वर्षी तिचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून तुमचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तेच ...

Advertisement
1/5

इथं अनेक अभिनेत्री त्यांच्या बोल्ड लूकमुळं चर्चेचा विषय ठरु लागल्या आहेत. पण, काहीजणी मात्र त्याला आजही अपवाद ठरत आहेत. (bollywood Actress Amrita rao grabs attentio with her beauty at the age of 41)

2/5

यातलं एक नाव म्हणजे अभिनेत्री अमृता राव, हिचं. अमृतानं 'विवाह' या चित्रपटातून लोकप्रियतेचं शिखर गाठलं. अभिनेता शाहिद कपूरसोबत तिनं या चित्रपटातून स्क्रीन शेअर केली आणि पाहता पाहता ती प्रसिद्धीझोतात आली. एका सालस भूमिकेनं अमृता रातोरात अनेकांच्या गळ्यातील ताईत झाली.

 

3/5

अनेक तरुणांनी तर, लग्नासाठी अशीच सालस मुलगी हवी असाही सूर आळवला. अमृतानं मिळवलेली हीच लोकप्रियता आजही टीकून आहे. वयाची चाळीशी ओलांडलेली असताना आणि एका मुलाची आई असतानाही तिचं सौंदर्य मात्र तसुभरही कमी झालेलं नाही. 

4/5

2016 मध्ये अमृतानं आरजे अनमोल याच्याशी लग्न केलं. लग्नाच्या काही काळ आधीपासूनच तिनं चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं. पण, सोशल मीडियाव मात्र ती कायम सक्रिय राहिली. 

5/5

अमृतानं पतीच्या सोबत मिळून युट्यूब चॅनलसाठी काही व्हिडीओसुद्धा केले. ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. थोडक्यात या गोड अभिनेत्रीला प्रत्येक वेळी पाहून तिचं सौंदर्य न्याहाळत चाहते हेच म्हणू लागले की, समय का ये पल.... थम सा गया है! 





Read More