PHOTOS

Malaika Arora Pregnancy : मलायक अरोरा गरोदर? अर्जून कपूरने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, म्हणाला "आमच्या आयुष्याशी..."

y: सोशल मीडियावर सतत कोणी ना कोणीतर सेलिब्रिटी गर्भवती असल्याची चर्चा सुरु असते. या चर्चेत आता बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच...

Advertisement
1/5

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमी आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. याशिवाय आपल्या खासगी आयुष्यामुळे मलायकाचं नाव नेहमीच चर्चेत असतं. अर्जून कपूर (Arjun Kapoor) आणि मलायकाचं नातं आता जगजाहीर असून अनेक ठिकाणी ते एकत्र दिसत असतात. या सर्व चर्चांदरम्यान मलायका अरोरा गर्भवती असल्याची अफवा उडाली आहे. ज्यावरुन अर्जुन कपूर संतापला आहे. 

 

2/5

मलायका अरोरा गर्भवती असल्याच्या वृत्तावर अर्जुन कपूरने नाराजी जाहीर केली असून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

 

3/5

"आमच्याबद्दल वारंवार अशा बातम्या लिहिल्या जात आहेत. अनेकदा आम्ही अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा या बातम्या मीडियात प्रसारतात तेव्हा मात्र ते सत्य म्हणून पाहिलं जातं जे फार चुकीचं आहे. आमच्या खासगी आयुष्याशी खेळण्याची हिंमत करु नका," असा संताप अर्जूनने व्यक्त केला आहे.

 

4/5

अर्जुनच्या या पोस्टवरुन मलायका गर्भवती असल्याचं वृत्त पूर्णपणे खोटं असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान अर्जुनने याआधीही या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

5/5

अर्जून कपूर नेहमीच सोशल मीडियावर मलायकासोबतचे फोटो शेअर करत असतो. पण पहिल्यांदाच त्याला इतकं संतापलेलं पाहण्यात आलं आहे. 

 





Read More