PHOTOS

आमिर खानने घेतली सायरा बानोंची भेट, फोटो पोस्ट करत म्हणाल्या "तो कठीण काळात..."

ीच्या लग्नाच्या धामधुमीत व्यस्त आहे. आमिर खानने लेक इरा खान लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांची भेट घेतली. याचे ...

Advertisement
1/8
आमिर खान लेकीच्या लग्नात व्यस्त
आमिर खान लेकीच्या लग्नात व्यस्त

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानला हा सध्या त्याच्या लेकीच्या लग्नाच्या धामधुमीत व्यस्त आहे. आमिर खानची लेक इरा खान ही लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. 

2/8
आमिर खान सायरा बानो भेट
आमिर खान सायरा बानो भेट

लेकीच्या लग्नाच्या धामधुमीत आमिर खानने नुकतंच दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांची भेट घेतली. यावेळी तो, त्याची आई झिनत खान, पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव आणि बहिण निखहत खान यांचे फोटो समोर आले आहेत.

3/8
सायरा बानोंची पोस्ट
सायरा बानोंची पोस्ट

सायरा बानो यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी दिवंगत अभिनेते आणि त्यांचे पती दिलीप कुमार आणि आमिर खानच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

4/8
नवा प्रवास सुरु
 नवा प्रवास सुरु

"कॅलेंडरप्रमाणे आयुष्य बदलत राहते. जसजशी वर्ष बदलतात आणि काळ पुढे सरकतो, त्यानुसार नवा प्रवास सुरु होतो. या सतत होणाऱ्या बदलांमध्ये एक सातत्य राहते."

5/8
माझ्या आणि दिलीप साहेबांसाठी तो खास
माझ्या आणि दिलीप साहेबांसाठी तो खास

"माझ्या आणि दिलीप साहेबांसाठी आमिर खान हा सातत्याने सोबत असलेल्या माणसांपैकी एक आहे. आमिर हा कठीण काळातही माझ्यासोबत होता."

6/8
मला अजूनही आठवतंय की....
मला अजूनही आठवतंय की....

"मला अजूनही आठवतंय की जेव्हा मी दिलीप साहेबांची बायोग्राफी 'द सब्सटेंस एंड द शॅडो' तयार करत होती, तेव्हा आमिरने मला शक्य तेवढी सर्व मदत केली." 

7/8
तो सिनेसृष्टीपासून दूर
तो सिनेसृष्टीपासून दूर

"आमिर हा असा माणूस आहे, जो मला त्याचे कौतुक करण्यास भाग पाडतो. तो सिनेसृष्टीच्या ग्लॅमरस आयुष्यापासून दूर आहे."

8/8
आठवणींना उजाळा
आठवणींना उजाळा

"मला काल आमिर, किरण, झिनत (आमिरची आई) यांना भेटून प्रचंड आनंद झाला. नव्या वर्षाची सुरुवात त्यांच्यासोबत गप्पा मारत आणि दिलीप साहेबांच्या आठवणींना उजाळा देत झाली. हा संपूर्ण अनुभव फार चांगला होता", असे सायरा बानो यांनी म्हटले आहे.





Read More