PHOTOS

अमरावतीचा खासदार कसा हवा? शिव ठाकरे म्हणाला...

शिव ठाकरेने अमरावतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...
Advertisement
1/9
शिव ठाकरेने बजावला मतदानाचा हक्क
शिव ठाकरेने बजावला मतदानाचा हक्क

'बिग बॉस' फेम अभिनेता शिव ठाकरेने अमरावतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.

2/9
मतदानानंतर केले फोटो शेअर
मतदानानंतर केले फोटो शेअर

शिव ठाकरेने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

3/9
मतदारांना केले आवाहन
मतदारांना केले आवाहन

"मी मतदान केले, आता तुम्हीही करा", असे आवाहन करणारे कॅप्शन शिव ठाकरेने दिले आहे.

 

4/9
प्रसारमाध्यमांशी साधला संवाद
प्रसारमाध्यमांशी साधला संवाद

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शिव ठाकरेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

 

5/9
मतदान करणं हा आपला राष्ट्रधर्म
मतदान करणं हा आपला राष्ट्रधर्म

यावेळी तो म्हणाला, मतदान करणं हा आपला राष्ट्रधर्म आहे. माझं वैयक्तिक असं मत आहे की आपण वर्षभर जेव्हा काही गोष्टींवर आपली मत माडंतो. 

6/9
एक मत खूप महत्त्वाचे
एक मत खूप महत्त्वाचे

त्याआधी आपण मतदान करायला हवं, हा आपला पहिला अधिकार आहे. कधीकधी एका मताने काय होतंय, असाही विचार काही लोक करतात. पण आपलं एक मत खूप महत्त्वाचे असते, असेही शिव ठाकरेने सांगितले.

7/9
मतदान करणं हा आपला हक्क
मतदान करणं हा आपला हक्क

त्यामुळे वेळात वेळ काढून घरातून बाहेर निघायला हवं. मतदान करणं हा आपला हक्क आहे, त्यामुळे तो नक्की बजावा, असे आवाहन शिव ठाकरेने केले आहे.

8/9
असा असावा अमरावतीचा खासदार
असा असावा अमरावतीचा खासदार

अमरावतीचा खासदार हा विकासावर जास्त भर देणारा आणि समजूतदार असावा, अशी इच्छाही शिवने व्यक्त केली.  

9/9
तर मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल
तर मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल

अमरावतीची तरुण पिढी खूपच टॅलेंट आहे. अनेक डॉक्टर, इंजिनिअर किंवा कलाकार हे बाहेर पुण्यात जाऊन काम करतात. त्यामुळे त्या गोष्टी जर इथे सुरु झाल्या तर मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल, असेही शिव ठाकरे म्हणाला.





Read More