PHOTOS

डॉ. आंबेडकरांनी अभ्यासासाठी वापरलेली खुर्ची आणि चष्मा.. बाबासाहेबांचे अतिशय दुर्मिळ फोटो

प्रिल रोजी 134 वी जयंती साजरी करत आहोत. बाबासाहेबांचं कार्य आणि त्यामागील मेहनत प्रत्येकाला कळावी या उद्...

Advertisement
1/12
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासाची खुर्ची
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासाची खुर्ची

डॉ. भिमराव आंबेडकरांची अभ्यासाची खुर्ची. बाबासाहेबांनी या अभ्यासात बसून तासन् तास अभ्यास केला आहे. हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.  

2/12
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चष्मा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चष्मा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड अभ्यासू होते. त्यावेळीची त्यांची अभ्यासाची जागा काही पुस्तके आणि त्यांचा चष्मा. 

3/12
फेडरेशनच्या परिषद
फेडरेशनच्या परिषद

नागपूर येथे फेडरेशनच्या परिषदेच्या वेळी अनुसूचित जाती महासंघाच्या महिला प्रतिनिधींसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 8 जुलै 1942 सालचा फोटो. 

4/12
प्रजासत्ताक भारताचे पहिले मंत्रिमंडळ
प्रजासत्ताक भारताचे पहिले मंत्रिमंडळ

हा फोटो 31 जानेवारी 1950 सालचा असून राष्ट्रपतींसह प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे छायाचित्र आहे. या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाग, पंतप्रधान जवाहरलाल नेहरु व इतर मंत्री 

5/12
काळाराम मंदिर सत्याग्रह
काळाराम मंदिर सत्याग्रह

काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर सत्याग्रहामधील बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर सत्याग्रही यांच्यासोबतचा दुर्मिळ फोटो.

6/12
बाबासाहेब माईसाहेब यांच्यासोबत
बाबासाहेब माईसाहेब यांच्यासोबत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिली पत्नी रमाबाईंच्या निधनानंतर 14 वर्षांनी दुसरं लग्न केलं. बाबासाहेबांनी डॉ. शारदा कबीर यांच्याशी 14 एप्रिल 1948 साली लग्न झालं. आंबेडकरांनी शारदा यांचं लग्नानंतर नाव सविता असे ठेवले. या फोटोत माईसाहेब म्हणजे डॉ. सविता आंबेडकर आणि स्वतः बाबासाहेब आणि त्यांचा आवडता कुत्रा.   

7/12
बाबासाहेब मजूरमंत्री
बाबासाहेब मजूरमंत्री

व्हाइसरॉय लॉर्ड वेव्हल्सच्या कार्यकारीत परिषदेत मजूरमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसोबत होते. जुलै 1942 चा हा फोटो आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी तर लढा दिलाच पण त्यासोबतच त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी देखील लढा दिला. 

8/12
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात त्यांचे सहकारी आणि कुटुंबियांचे मोठ्याचे योगदान होते. त्यांच्या समवेत काढलेला हा फोटो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचांवर आधारीत 'माझी आत्मकथा' या पुस्तकात याचा उल्लेख आहे. 

9/12

रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी जाहीर केलेल्या जातीय निवाड्याला विरोध करुन महात्मा गांधींनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरु केलं होतं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींमध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी प्रसिद्ध पुणे करार याच ठिकाणी करण्यात आला होता. यावेळी मुकुंद जयकर, तेजबहादूर सप्रे आणि डॉ. आंबेडकरांनी यावेळी करारावर सही केली. 

10/12
चवदार तळे सत्याग्रह
चवदार तळे सत्याग्रह

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात चवदार तळे हे ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला 'महाडचा सत्याग्रह' या नावानेही ओळखले जाते. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला.

11/12
भीमा कोरेगाव स्तंभाला प्रथम भेट
भीमा कोरेगाव स्तंभाला प्रथम भेट

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव स्तंभाला 1 जानेवारी 1927 रोजी प्रथम भेट दिली. आपल्या सहकाऱ्यांसमवेत विजयस्तंभाला मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. यावेळी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक बाबासाहेबांनी केले. 

12/12
इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक
इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक

दादर येथील इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. इंदू मिलमध्ये जागतिक स्तराचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक असणार आहे. 350 फूट उंच अशी ही बाबासाहेबांची प्रतिमा आहे. 





Read More