PHOTOS

स्वप्नाची 'सुवर्ण' उडी... आणि अश्रुंच्या धारा!

ारलेलं एक शेड... जेवढी लहान जागा तितकीच यात राहणाऱ्या लहानगे, वृद्ध आणि तरुणांची संख्या जास्त... जीर्ण अवस्थेतील एका टीव्हीवर ते आशियाई...

Advertisement
1/8
पहिली सुवर्ण विजेती
पहिली सुवर्ण विजेती

स्वप्ना बर्मनच्या विजयावर तिच्या कुटुंबीयांची ही अवस्था होती... उत्तर बंगाच्या जलपाईगुडी शहारच्या एक झोपडीवजा घरात राहणाऱ्या या कुटुंबातील एका मुलीनं ही कामगिरी करून दाखवली होती. एशियाडच्या हेप्टाथलॉन इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी स्वप्ना पहिला महिला खेळाडू आहे. 

2/8
आईच्या भावना अनावर
आईच्या भावना अनावर

आपल्या मुलीच्या यशानं स्वप्नाची आई बाशोना इतकी भावूक झाली की ती बराच वेळ फक्त रडत होती... तिला काही बोलताही येत नव्हतं... की आपल्या भावनाही व्यक्त करता येत नव्हत्या... स्वप्नासाठी ती संपूर्ण दिवस देवाजवळ प्रार्थना करत होती... 

3/8
पहिल्या स्थानावर
पहिल्या स्थानावर

स्वप्नानं सात इव्हेंटमध्ये एकूण 6026 अंकांसोबत पहिलं स्थान मिळवलं. स्वप्नानं उंच उडी (1003 अंक), भाला फेक (872 अंक) मध्ये पहिला तसंच गोळा फेक (707 अंक) आणि लांब उडी (865 अंक) दुसरा क्रमांक मिळवला. स्वप्नाचा विजय पक्का झाला तसं जलपाईगुडीच्या घोषपाडामध्ये स्वप्नाच्या घराबाहेर लोकं जमू लागली... मिठाई वाटली गेली... 

4/8
आईच्या अश्रूधारा
आईच्या अश्रूधारा

स्वप्नाचे वडील पंचन बर्मन रिक्षा चालवतात... परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांनी अंथरुण धरलंय. 'आम्ही कधीही स्वप्नाच्या गरजा पूर्ण करू शकलो नाही... परंतु, तिनं मात्र कधीही याबद्दल तक्रार केली नाही' असं स्वप्नाच्या आईनं भावूक होत म्हटलं.

5/8
स्वप्नाची जिद्द...
स्वप्नाची जिद्द...

'मी 2006 ते 2013 पर्यंत तिचा कोच राहिलो... आपल्या खेळासाठी महागडी उपकरणं खरेदी करणं, स्वप्नाला शक्य नव्हतं... गरीब कुटुंबातून येणाऱ्या मुलांसाठी आपल्या ट्रेनिंगचा खर्च उचलणं शक्य होत नाही... पण स्वप्ना खुपच जिद्दी आहे' असं स्वप्नाचे माजी कोच सुकांत सिन्हा यांनी म्हटलंय. 

6/8
पायांची सहा बोटं...
पायांची सहा बोटं...

एक वेळ अशीही आली की जिथे स्वप्नाला चांगल्या स्पोर्टस शूज घेण्यासाठीही संघर्ष करावा लागला... कारण स्वप्नाच्या दोन्ही पायांना सहा बोटं आहेत. पायाची रुंदी जास्त असल्या कारणानं खेळांदरम्यान स्वप्नाच्या अडचणी वाढत होत्या. कारण याकारणानं तिचे बूट दीर्घकाळ टीकत नाहीत. 

7/8
कोण घेणार पुढाकार?
कोण घेणार पुढाकार?

मी राष्ट्रीय क्रीडा दिनाला हे सुवर्ण पदक जिंकलं त्यामुळे ते खासच आहे.... मी इतर लोक वापरतात ते सामान्य बूट परिधान करते. प्रॅक्टीस दरम्यान या बूटांचा त्रास होत होता...असं स्वप्नानं म्हटलंय. यावर, एखाद्या कंपनीनं तुझ्यासाठी खास बूट बनवावेत असं वाटतं का? असा प्रश्न तिला विचारला तेव्हा... 'निश्चितच, त्यामुळे माझ्यासाठी सोपं होईल' असं स्वप्नानं म्हटलंय. 

8/8
दातांचं दुखणं बाजुला ठेवून...
दातांचं दुखणं बाजुला ठेवून...

या खेळादरम्यान स्वप्नानं तिच्या गालावर एक पट्टी लावली होती... त्याबद्दल विचारल्यावर तिनं आपल्याला दातदुखीचा दोन दिवसांपासून त्रास होत असल्याचंही सांगितलं... त्रास वाढत होता, पण मेहनत वाया जाऊ नये, अशीही इच्छा होती... त्यामुळे दातदुखी विसरून मी खेळले, असं स्वप्नानं म्हटलंय.  





Read More