PHOTOS

पाकिस्तानविरुद्ध रोहित 56 ऐवजी 78 वर बाद झाला असता तर...; 'ते' गणित थोडक्यात चुकलं!

Sharma Score: भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या आशिया चषकामधील पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी ग...

Advertisement
1/12

कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आशिया चषक स्पर्धेमधील सुपर-4 च्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माला लय गवसली.

2/12

रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावलं. मात्र रोहित शर्मा सेट झाला आणि मोठा स्कोअर करणार असं वाटत असताना रोहित शर्मा बाद झाला.

3/12

सामन्यातील 17 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संघाची धावसंख्या 121 वर असताना शादाब खानच्या फिरकी गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला.

4/12

रोहित शर्माने 49 चेंडूंमध्ये 56 धावा करुन रोहित शर्मा 56 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. 

5/12

मात्र रोहित शर्मा 78 धावांवर बाद झाला असता तर त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम झाला असता.

6/12

म्हणजेच रोहितने अजून 22 धावा केल्या असत्या तर तो तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणार सहावा फलंदाज ठरला असता. 

7/12

मात्र रोहित पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 56 वर बाद झाल्याने त्याला आणखीन एक सामना वाट पहावी लागणार आहे.

8/12

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्यांमध्ये रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुल, राहुल जद्रविड आणि एम. एस. धोनीचा समावेश आहे. 

9/12

रोहित शर्माने 447 अंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 468 डावांमध्ये 17 हजार 508 धावा केल्या आहेत.

10/12

रोहित शर्माने एकूण 44 शतकं झळकावली असून 4 द्विशतकं झळकावली आहेत.

11/12

सचिन तेंडुलकरने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजेच 18 हजार 426 धावा केल्या आहेत. त्याने 1989 ते 2012 दरम्यान 463 सामन्यांमध्ये 452 डावांमध्ये 44.83 च्या सरासरीने या धावा केल्या.

12/12

सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी असून त्याने 2008 पासून आजपर्यंत 278 सामने खेळले असून 57.08 च्या सरासरीने 12904 धावा केल्या आहेत. विराटने या सामन्यात 96 धावा केल्या तर तो 13 हजार धावांचा टप्पा गाठेल.





Read More