PHOTOS

पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?

पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं? ...
Advertisement
1/7
पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?
 पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?

पंढरपुरच्या विठुरायाला अनेक उपमा देण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक उपमा म्हणजे कानडा विठ्ठला. श्रीज्ञानदेवांनी विठ्ठलाला कानडा आणि कर्नाटकु अशी दोन विशेषण लावली आहेत. त्यातील कानडा या शब्दांचा अर्थ जाणून घेऊया. 

2/7
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा

 अनेक संतांनी व कवींनी त्यांच्या गीतात विठ्ठलाला कानडा अशी उपमा दिली आहे. नामदेवांनी कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी असा उल्लेख केला आहे. तर, ग.दी माडगुळकर यांनीही कानडा राजा पंढरीचा असं वर्णन गीतात केलं आहे. 

3/7
कर्नाटकु
कर्नाटकु

कानडा या शब्दाचा अर्थ गूढ, अगम्य अशा अर्थानेही होतो. तर, कर्नाटकु या शब्दाचा अर्थ करनाटकु म्हणजे लीला दाखवणारा, असाही होतो, असे काही अभ्यासकांचे मत आहे. 

4/7
कर्नाटकात रहिवास
कर्नाटकात रहिवास

तर, काही अभ्यासकांच्या मते, कानडा म्हणजे ज्याचा रहिवास कर्नाटकात आहे. कर्नाटकातील हंपी येथे विठ्ठल मंदिर आहे त्यामुळं विठ्ठलाला कानडा असे बिरुद लागले आहे. 

5/7
पंडरगे
पंडरगे

पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. पंढरपूरचे प्राचीन नाव पंडरगे असं आहे. ते नावदेखील कानडेच आहे. 

 

6/7
कर्नाटक
कर्नाटक

 विठ्ठलाचे बहुतेक भाविक हे कर्नाटकातील आहेत. कानडा हा शब्द बऱ्याचठिकाणी वापरलेला आहे. तसंच, विठ्ठल दैवत कर्नाटकातून आलं आहे, असाही काही अभ्यासकांचा दावा आहे. 

7/7

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)