PHOTOS

Ashadhi Ekadashi 2024: 'विठ्ठल' शब्दाचा नेमका अर्थ काय? 99% लोकांना कल्पनाही नाही

Of Word Lord Vitthal: आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाची पंढरी वारकऱ्यांनी दुमदुमून गेली आहे. दरवर्षी आवर्जून होणारी गर्दी आणि विठूरायाला ए...

Advertisement
1/8

आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाची पंढरी वारकऱ्यांची गर्दी, टाळ-मृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. 

 

2/8

वारी, आषाढी एकादशी म्हटलं की आवर्जून तोंडी येणार शब्द म्हणजे विठ्ठल किंवा विठू माऊली!

 

3/8

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या या देवतेच्या विठ्ठल नावाचा नेमका अर्थ तुम्हाला माहितीये का? तुमच्यापैकी 99 टक्के लोकांना नक्कीच या शब्दाचा अर्थ ठाऊक नसणार. 

 

4/8

विठ्ठल या नावाची स्पष्टीकरणकथा सादर करण्याच्या हेतूने तो विटेवर उभा राहिलेच्या सांगितले आहे, असं लेखक रा. चिं. ढेरे यांनी 'श्री विठ्ठल : एक महासमन्वय' या पुस्तकात म्हटलं आहे.

 

5/8

या पुस्तकामध्ये विठ्ठल नामाचा अर्थ सांगण्यात आला असून विठ्ठल या शब्दाची तीन भागांमध्ये फोड होते.

 

6/8

विदा (ज्ञानेन), ठान् (अज्ञजनान्) लाति (गृहृाति) अशी विठ्ठल शब्दाची फोड करता येईल.

 

7/8

फोड करुन विठ्ठल शब्दाचा अर्थ, "अज्ञ जनाना जो ज्ञानाने स्वीकरतो, तो विठ्ठल!" असा होतो.

 

8/8

तर अनेक अभ्यासकांनी विष्णू- विष्टु- विठ्ठल अशा प्रक्रियेने विष्णुपासून विठ्ठल हे नाम बनले असं स्वीकारलं आहे.

 





Read More