PHOTOS

'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

Marathi: अरूण नलावडे हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. त्यांचा 'श्वास' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांनी एका मुलाखतीतून यावेळ...

Advertisement
1/8
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

ज्येष्ठ अभिनेते अरूण नलावडे हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहे. त्यानी मराठी नाटक, मालिका, चित्रपट, जाहिराती, ओटीटी या सर्व माध्यमांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. 

2/8
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

अगदी 'वादळवाट'पासून ते आत्ताच्या 'माझ्या नवऱ्याची बायको' अशा लोकप्रिय मालिकांतून ते घराघरात पोहचले आहेत. त्यातून त्यांचे अनेक लोकप्रिय चित्रपटही गाजले आहेत. 

3/8
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

त्यातील एक चित्रपट म्हणजे 2004 साली आलेला 'श्वास'. त्यांच्या अभियाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि सोबतच हा चित्रपट ऑस्करपर्यंतही गेला. 

4/8
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

नुकतीच त्यांनी 'द क्राफ्ट'ला मुलाखत दिली आहे. ज्यात त्यांनी या चित्रपटाविषयी एक खुलासा केला आहे. हा व्हिडीओ सध्या इन्टाग्रामवर चर्चेत आहे. 

5/8
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

यावेळी त्यांनी सांगितले की, अनेकांनी त्यांना असे सांगितले होते की हा चित्रपट त्यांनी करू नये, त्यांनी केला तर ते भिकेला लागतील. अशी त्यांनी आठवण शेअर केली होती. 

6/8
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

ते म्हणाले की, ''‘श्वास’ चित्रपटाची कथा 50 लोकांना ऐकवली. 50 पैकी 50 लोकं रडले पण त्यांनी आम्हाला हा चित्रपट करू नका असा सल्ला दिला. हा चित्रपट कोणी बघणार नाही. या विषयावर चित्रपट नको. हा खूप रडका चित्रपट आहे. तुम्ही सुद्धा हा चित्रपट करू नका, नाहीतर तुम्ही भिकेला लागाल. काहींनी तर कथेत बदल करायला सांगितलं. तुम्ही असं करा. तसं करा, असे सल्ले दिले. पण चित्रपटासाठी पैसे मात्र कोणीही दिले नाही.''

7/8
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

ही आठवण त्यांनी सांगितली आहे. यावेळी त्यांनी ही आठवण सांगून एक वेगळंच वास्तव आपल्यासमोर उभं केलं आहे. सध्या त्यांच्या या आठवणीची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. 

8/8
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

'श्वास' या चित्रपटाची कथा ही सर्वांनाच हलवून टाकणारी होती. त्यातून एका लहान मुलांच्या आयुष्यावर ही बेतलेली होती. या चित्रपटानं तेव्हा प्रेक्षकांवर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडला होता. 





Read More