PHOTOS

केवळ iPhone 15 नाही Apple उद्या जगासमोर आणणार 'हे' भन्नाट स्मार्ट गॅजेट्स

भरातील अतिशय महत्त्वाच्या अॅपलच्या इव्हेंटसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून, जाणून घ्य...

Advertisement
1/8
iPhone 15 Series Launch
iPhone 15 Series Launch

iPhone 15 Series Launch: अवघ्या काही तासांनीच दरवर्षीप्रमाणं यंदाचाही एक बहुप्रतिक्षित कार्यक्रम अॅपलकडून आयोजित करण्यात येणार असून, क्यूपर्टिनो, कैलिफ़ोर्निया येथील मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

 

2/8
अॅपल गॅजेट्स
अॅपल गॅजेट्स

फक्त आयफोन 15 आणि त्याचे व्हेरिएंटच नव्हे, तर आणखीही काही दमदार मॉडेल्स, गॅजेट्स अॅपलकडून लाँच करण्यात येणार आहेत. त्यामुळं तंत्रज्ञानाच्या साथीनं कायम UPDATE राहणाऱ्यांसाठी ही पर्वणीच असेल. 

 

3/8
4 फोन लाँच
4 फोन लाँच

यंदाच्या अपडेट इव्हेंटमध्ये अॅपलकडून 4 फोन लाँच करण्यात येणार आहेत. यामध्ये iPhone 15, 15 प्लस, 15 प्रो आणि 15 प्रो मॅक्सचा समावेश आहे. इथं फक्त प्रो मॅक्सऐवजी कंपनी अल्ट्रा हे विशेषनाम वापरू शकते. 

 

4/8
आयफोन 15 ची किंमत
आयफोन 15 ची किंमत

प्राथमिक माहितीनुसार भारतात आयफोन 15 ची किंमत साधारण 80 हजारांच्या घरात असेल असं म्हटलं जात आहे. फक्त आयफोनच नव्हे, तर या इव्हेंटमध्ये स्मार्टवॉच सीरीज, Airpods लाँच होण्यासोबतच नव्या OS ची माहितीही दिली जाणार आहे. 

 

5/8
हार्ट रेट सेंसर
हार्ट रेट सेंसर

अधिकाधिक उत्तम हार्ट रेट सेंसर आणि U2 चिप असणारी अॅपल वॉच सीरिज 9 लाँच केली जाऊ शकते. तर,  iOS 17, iPadOS 17 आणि  watchOS 10 च्याही अपडेट कंपनी सादर करू शकते. 

 

6/8
वॉच सीरिज
वॉच सीरिज

अॅपलची नवी वॉच सीरिज दोन आकारांमध्ये उपलब्ध असेल असं सांगण्यात येत आहे. यामध्ये एक वॉच 41 मिमी आणि दुसरं 45 मिमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

7/8
AirPods Pro
AirPods Pro

या इव्हेंटमध्ये अॅपलकडून AirPods Pro ला यूएसबी टाइप-सी चार्जरसहित लाँच केलं जाऊ शकतं. पण, यामध्ये दुसरी कोणती हार्डवेअर अपडेट मिळणार नाहीये हे लक्षात घ्या.

 

8/8
तुम्ही तयार आहात ना?
 तुम्ही तयार आहात ना?

 थोडक्यात अॅपल बरेच सरप्राईज घेऊन येतंय, तुम्ही तयार आहात ना? 





Read More