PHOTOS

अलू अर्जूनपेक्षा उत्तम अभिनेता असल्याचा खेर यांचा दावा? म्हणाले, 'मला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता कारण...'

Advertisement
1/12

Anupam Kher Movie The Kashmir Files: 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यापैकी एक पुरस्कार पल्लवी जोशीला मिळाला. सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवीने पटकावला.

2/12

तसेच 'द काश्मीर फाइल्स'ने 'बेस्ट फीचर फिल्म ऑन नॅशनल इंटीग्रेशन' हा पुरस्कारही मिळवला.

3/12

मात्र या यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेते अनुपम खेर यांची पूर्ण निराशा झाली. काश्मीरी पंडिताची संवेदनशील भूमिका साकारणाऱ्या अनुपम खेर यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र हा पुरस्कार 'पुष्पा' चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला देण्यात आला. 

4/12

'द काश्मीर फाइल्स'मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पुष्कर नाथ ही भूमिका मला फार जवळची होती असं म्हटलं. काश्मिरी पंडितांच्या भावना पडद्यावर उतरवण्यासाठी आपल्याला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.

5/12

अनुपम खेर यांचा अभिनय पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. मात्र एवढा खास अभिनय करुनही आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही यामुळे अनुपम खेर नाराज झाले आहेत. 'अभिव्यक्ति' नावाच्या साहित्य उत्सवामध्ये त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याबद्दल उघडपणे खेद व्यक्त केला आहे.

6/12

''द काश्मीर फाइल्स'मधील माझी भूमिका फारच छान होती. या भूमिकेत प्राण होता. मला ही साकारताना अभिनयावर फारसं अवलंबून रहावं लागलं नाही. मला भावनात्मक स्तरावर व्यक्त होण्यासाठी नाटक करावं लागलं नाही,' असं अनुपम खेर म्हणाले.

7/12

'मी माझ्या खऱ्याखुऱ्या भवना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. दरवेळी मी असाच प्रयत्न करतो. काही भूमिका साकारण्यासाठी फार ईमानदार राहण्याची गरज नाही. कारण त्या स्क्रीप्टला तशी गरज नसते,' असंही अनुपम खेर यांनी म्हटलं.

8/12

''द काश्मीर फाइल्स'मध्ये पुष्कर नाथ अशी भूमिका आहे ज्यासाठी स्क्रीप्टची गरज नव्हती. कारण मी या भूमिकेमध्ये शिरल्यानंतर मी प्रत्येक श्वास ती भूमिका जगलो आहे,' असंही अनुपम खेर यांनी म्हटलं आहे. 

9/12

68 वर्षीय अनुपम खेर यांनी, ''द काश्मीर फाइल्स'मध्ये माझी भूमिका उत्तम होती. तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता', अशी इच्छाही बोलून दाखवली.

10/12

मात्र ज्या व्यक्तीला यंदा म्हणजेच 2023 मध्ये सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ती व्यक्तीही अगदी योग्य निवड असल्याचं अनुपम खेर म्हणालेत.

11/12

"मी जेव्हा 'पुष्पा' चित्रपट पाहिला तेव्हा अल्लू अर्जूनचं कौतुक केलं होतं. मी याबद्दल ट्वीटही केलं होतं," असंही अनुपम खेर म्हणाले. मात्र आपल्याला पुरस्कार मिळाला नाही याचं दु:ख व्यक्त करण्याचा हक्क मला आहे, असंही खेर यांनी स्पष्ट केलं.

12/12

'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट 25 कोटींमध्ये तयार केला आणि या चित्रपटाने जगभरामध्ये 237 कोटींची कमाई केली. 





Read More