PHOTOS

बर्फाच्या समुद्रातून येतंय जगावर मोठं संकट; पाहा चिंता वाढवणारे Photos

कायमच आश्चर्यचकित करणारा जगातील एक अद्वितीय भाग म्हणजे अंटार्क्टीक महासागर आणि त...

Advertisement
1/7
आश्चर्याचा विषय
आश्चर्याचा विषय

जगासाठी आश्चर्याचा असणारा हा परिसर सध्या जगाची चिंता वाढवतोय. कारण, ठरतेय ती म्हणजे जागतिक तापमानवाढ. 

 

2/7
अंटार्क्टीक महासागर
अंटार्क्टीक महासागर

आपल्या दैनंदिन आयुष्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या अंटार्क्टीक महासागरात असे काही बदल पाहायला मिळत आहेत जे तुम्हाला चिंतेत टाकू शकतात. 

 

3/7
जागतिक तापमानवाढ
जागतिक तापमानवाढ

कारण ठरतंय ते म्हणजे जागतिक तापमानवाढ. एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार अंटार्क्टीकातील बर्फाचं प्रमाण मोठ्या फरकानं कमी होताना दिसत आहे. 

 

4/7
17 मिलियन चौरस किलोमीटर
 17 मिलियन चौरस किलोमीटर

जागतिक तापमानवाढीमुळं इथं कमी होणारी बर्फाची पातळी नेमकी किती आहे याचं चित्र अधिक स्पष्ट होत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार सध्या हे बर्फाचं प्रमाण 17 मिलियन चौरस किलोमीटर इतकंच असल्याचं सांगितलं जात आहे. 

 

5/7
विक्रमी नोंद
 विक्रमी नोंद

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 1.5 मिलियन चौरस किलोमीटर बर्फ इथं कमी असल्याचं आढळून आलं. मागील तास वर्षांमधील ही विक्रमी नोंद ठरत आहे. 

 

6/7
तापमानाच्या आकड्यावर नियंत्रण
तापमानाच्या आकड्यावर नियंत्रण

अंटार्क्टीकातील परिसर जगातील तापमानाच्या आकड्यावर बहुतांशी नियंत्रण ठेवताना दिसतो. पण, आता मात्र बर्फ वितळण्याचा वेग वाढल्यामुळं य़ेत्या काळात जीवघेण्या साथींचं प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 

 

7/7
निसर्गचक्रानुसार...
निसर्गचक्रानुसार...

निसर्गचक्रानुसार अंटार्क्टीकामध्ये असणारा पांढरा पृष्ठभाग सूर्याच्या उर्जेला परावर्तित करून वातावरणात पाठवतो आणि तिथं असणाऱ्या पाण्याचं तापमान थंडच राहतं. (छाया सौजन्य- Dr Robbie Mallett)





Read More