PHOTOS

PHOTO: अनन्या, सारा की जान्हवी, अनंत-राधिकाच्या हळदीमध्ये कोणी वेधलं लक्ष

Wedding: अंबानी कुटुंबाकडून मुंबईतील अँटिलियामध्ये अनंत- राधिका यांच्या हळदी समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक अभिनेत्रीं...

Advertisement
1/6
12 जुलैला लग्नबंधनात अडकणार
12 जुलैला लग्नबंधनात अडकणार

अनंत-राधिका यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून ते 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच अँटिलियामध्ये अनंत-राधिकाचा हळदी कार्यक्रम पार पडला. यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 

2/6
राधिका मर्चंट हळदी लूक
राधिका मर्चंट हळदी लूक

सारा अली खान, जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर आणि अनन्या पांडे या सतत हटके फॅशन आणि लुकमुळे चर्चेत असतात. अनंत-राधिकाच्या हळदीमध्ये कोणी काय परिधान केले. चला तर मग जाणून घेऊया

3/6
सारा अली खान
सारा अली खान

अनंत राधिकाच्या हळदीमध्ये सारा अली खानने हळदीसाठी मल्टीकलर लेहेंगा परिधान केला होता. पॅनेल केलेला ब्लाउज, स्कर्ट आणि बॅकलेस चोली आणि खांद्यावर दुपट्टा बांधला होता.  पारंपारिक लेहेंग्यासह भरतकाम केलेला बटवा, नेकलेस, कडा आणि अंगठ्यांमुळे ती अधिकच सुंदर दिसत होती.

4/6
जान्हवी कपूर
जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने अनंत-राधिकाच्या हळदीसाठी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती.  मोत्याची सजावट आणि बॉर्डरवर टॅसेल्स असलेल्या साडीमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. मोकळे सोडलेले केस, कानातले डूल आणि अंगठ्यांमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.

5/6
अनन्या पांडे
अनन्या पांडे

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदी समारंभात अनन्या पांडेने अनारकली सूट परिधान केला होता. तिने कुर्त्याला मॅचिंग दुपट्टा आणि पायजमा घातला होता. सोन्याच्या बांगड्या, रिंग्ज, मांग टिक्का लावला होता.

6/6
मानुषी छिल्लर
मानुषी छिल्लर

मानुषी छिल्लरने या सोहळ्यासाठी लेहेंगा घातला होता. त्याचबरोबर तिने बटवा, नेकलेस, अंगठ्या आणि कानातले घातले होते. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. 





Read More