PHOTOS

एक ग्लास दारु प्यायली तरी...; संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा; सर्वाधिक फटका तरुणांना

असतं. मात्र बरेचजण नियमितपणे तर काहीजण कधीतरी मद्यपान करतात. मद्यपानाचा दिर्घकालीन परिणाम होतात हे जगजाहीर आहे. मात्र आता मद्यपानामुळे ...

Advertisement
1/14

मद्य हे आरोग्यासाठी हानीकारक असतं. मात्र काहीजण रोज मद्याचं सेवन करतात तर काहीजण कधीतरी मद्यपान करतात. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनामध्ये मद्य सेवनासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

2/14

या संशोधनानुसार, जे लोक रोज किमान एक ग्लास मद्याचं सेवन करतात त्यांना रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. अशा लोकांचं ब्लड प्रेशर वेगाने वाढतं. 

3/14

'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तानुसार, उच्च रक्तदाबाचा सामना त्या तरुणांनाही करावा लागत आहे ज्यांना यापूर्वी कधीच रक्तदाबाचा त्रास जाणवला नाही. हे फारच आश्चर्यकारक असल्याचं मानलं जात आहे.

4/14

अमेरिकेतील 'असोसिएशन जर्नल हायपरटेन्शन'मध्ये यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. सन 1997 सालापासून 2021 पर्यंत एकूण 7 आंतरराष्ट्रीय अभ्यासांमधील आकडेवारीमध्ये असं दिसून आलं की, रोज किमान एक ग्लास मद्याचं सेवन करतात त्यांचं ब्लड प्रेशर अधिक वेगाने वाढची भीती अधिक असते. कधीतरी मद्यसेवन करणाऱ्या लोकांपेक्षा ब्लड प्रेशरचा त्रास रोज मद्यपान करणाऱ्यांना अधिक असतो.

5/14

'मायो क्लिनिक'ने दिलेल्या वृत्तानुसार, मद्यपानामुळे होणाऱ्या उच्च रक्तबादासंदर्भातील लक्षण समोर येण्याआधी मद्यामुळे शरीरातील अवयवांवर बराच दुष्परिणाम होतो. लक्षणं दिसण्याआधी अंतर्गत बराच डॅमेज झालेला असतो असं संशोधक सांगतात. 

6/14

रक्तदाब नियंत्रणात राहिलं नाही तर अपंगत्व, प्रकृती खालावणे आणि अगदी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढते.

7/14

मद्यपानासंदर्भातील या संशोधनामधील वरिष्ठ संशोधक आणि लेखक डॉ. मार्को विसिटी यांनी, फार कमी प्रमाणात मद्यसेवन करणाऱ्या तरुणांमध्येही उच्च रक्तदाबाची समस्या फार गंभीर स्वरुपात असल्याचं पाहून आश्चर्य वाटल्याचं सांगितलं. 

8/14

ब्लड प्रेशर हे मिलीमीटरमध्ये मोजलं जातं. दोन वेगवेगळ्या आकड्यांमध्ये रक्तदाब मोजला जातो. वरील नंबरला सिस्टोलिक म्हणतात. हृदयच्या स्नायूंशी हलचाली आणि रक्त हृदयामधून पंप करण्याची प्रक्रियेचं मोजमाप करतो. तर खाली दिसणाऱ्या नंबरला डायस्टोलिक म्हणतात. यामधून हृदयाच्या ठोक्यांदरम्यानचा दबाव मोजला जातो.

9/14

रोज फार कमी प्रमाणात मद्यसेवन करणाऱ्या महिला आणि पुरुषांमध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशरवर नकारात्मक परिणाम होतो, असं या अभ्यास दिसून आलं.

10/14

या संशोधनाचे सहलेखक पॉल व्हेल्टन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रीडिंग हे हृदयासंदर्भातील आजारांचा धोका अधिक असल्याचं दर्शवतात. मात्र तरुणांमध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशरचा धोका अधिक असतो."

11/14

अमेरिकी हार्ट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार सिस्टोलिक रीडिंग 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना असलेला हृदयाच्या धोक्याचा इशारा दर्शवतात.

12/14

सामान्यपणे रिस्टोलिक रीडिंग हे 120 एमएम एचजी किंवा त्याहून कमी असते. मात्र वय वाढत जातं तसं रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि त्या अधिक पातळ होतात. त्यामुळे हे रीडिंग वाढतं. 

13/14

सामान्यपणे डायस्टोलिक रीडिंग 80 एमएम एचजीहून कमी असतं. मात्र वय वाढत गेल्यानंतर धमण्यांची लवचिकता कमी होते. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हटलं जातं. 

14/14

शरीरातील रक्तदाब वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किडनीसंदर्भातील समस्यांचा धोका अधिक वाढतो.





Read More