PHOTOS

ओवाळिते भाऊराया... आनंद, हास्य आणि फक्त प्रेम; सुप्रिया सुळे यांनी 'दादां'सोबतच अशी साजरा केली भाऊबीज

ates bhaubij : मुळात राजकारणात कितीही मतभेद असले तरीही नात्यांचं स्वरुप बदलणार नाही, असं या कुटुंबातील मंडळींनी वेळो...

Advertisement
1/7
शरद पवार
शरद पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मातब्बर राजकारणी, शरद पवार यांच्या घरी दरवर्षी दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो. या सणाच्या निमित्तानं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येतं आणि पाहणाऱ्यांची नजर याच कुटुंबाच्या सोहळ्यावर खिळते. 

2/7
दिवाळीचा उत्साह
दिवाळीचा उत्साह

यंदा शरद पवार आणि कुटुंबीयांनी गोविंद बाग येथे दिवाळी पाडवा साजरा केला. यावेळी सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे अजित पवारांच्या उपस्थितीवर. अखेर अजित दादा तिथं आले आणि त्यांनी या क्षणांचा आनंद घेतला. 

 

3/7
पवार कुटुंब काटेवाडीत एकत्र
 पवार कुटुंब काटेवाडीत एकत्र

भाऊबीजेसाठी पवार कुटुंब काटेवाडीत एकत्र आलं आणि इथं राजकारणाच्या रिंगणात मतभेद असले तरीही भाऊ- बहिणीचं नातं अतिशय घट्ट असल्याचीच प्रचिती सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याकडे पाहून आली. 

4/7
पवार कुटुंबातील लेकीसुना
पवार कुटुंबातील लेकीसुना

सर्व बहिणींकडून अजित पवार यांनी ओवाळून घेतलं. यामध्ये त्यांची लाडकी बहीण, सुप्रिया सर्वात पुढे. चेहऱ्यावर हास्य, आनंद आणि एकमेकांबदद्लच्या आदरासोबतच न संपणारं प्रेम अशीच दृश्य यावेळी पाहायला मिळाली. 

5/7
छानसं फोटोसेशन
छानसं फोटोसेशन

अजित पवार यांच्यासोबत यावेळी पवार कुटुंबातील लेकिंनी छानसं फोटोसेशनही केलं. अजित पवारांप्रमाणंच इतर भावंडांना ओवाळत, हक्काची ओवाळणी घेत या बहिणी भावंडांनी भाऊबीज मोठ्या थाटामाटात साजरा केली. 

6/7
नात्याची वीण
नात्याची वीण

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर या खास क्षणांचे फोटो शेअर केले. 'भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज...या सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा', असं कॅप्शन लिहित त्यांनी हे फोटो शेअर केले. 

 

7/7
विशेष आभार
विशेष आभार

अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार यांनी भेट दिलेल्या साडीसाठीसुद्धा सुप्रिया सुळे यांनी त्यांचे मनापासून आभार मानले. (सर्व छायाचित्र- सुप्रिया सुळे/ इन्स्टाग्राम)

 





Read More