PHOTOS

PHOTO: AC चे स्फोट का होऊ लागलेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका; गारेगार हवेच्या नादात आयुष्यभराचं गमावून बसाल

सध्या प्रचंड उकाडा असल्याने एसीचा प्रचंड वापर केला जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणांहून एसीचा स्फोट झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.  ...
Advertisement
1/8

सध्या प्रचंड उकाडा असल्याने एसीचा प्रचंड वापर केला जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणांहून एसीचा स्फोट झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. 

 

2/8

नुकतंच गाझियाबादमधील एका सोसायटीत एसीचा स्फोट झाल्याने आग लागली. गेल्या एका महिन्यात अशी 2 प्रकरणं समोर आली आहेत. 

 

3/8

हे स्फोट नेमके कशामुळे झाले हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण अशामध्ये अनेकांच्या मनात एसीमध्ये स्फोट होण्याची नेमकी कारणं काय असतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 

4/8
कंप्रेसरमध्ये लीक
कंप्रेसरमध्ये लीक

एसीचा स्फोट होण्याची अनेक कारणं असून यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे कंप्रेसमरमध्ये लीक होणं. यामुळे स्फोटाची शक्यता फार बळावते.

 

5/8
कमी तापमानावर वापर
कमी तापमानावर वापर

जर तुम्ही एसी फार कमी तापमानावर वापरत असाल तर एसीला फार मेहनत घ्यावी लागते. यामुळेही दुर्घटना होऊ शकते. 

 

6/8
फिल्टर स्वच्छ न करणं
फिल्टर स्वच्छ न करणं

जर तुम्ही एसीची फार काळ सर्व्हिसिंग केली नसेल आणि अस्वच्छ फिल्टरसह वापरत असाल तर तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकतं. 

 

7/8

जर तुम्हाला दुर्घटना टाळायची असेल तर वेळोवेळी एसीचं सर्व्हिसिंग करत राहा. 

 

8/8

याशिवाय एसीचा वापर करताना ओव्हर कुलिंग टाळायला हवं. तसंच मोठ्या खोलीसाठी छोटा एसी वापरणंही धोकादायक असतं. 

 





Read More